अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. याच यादीतील एक नाव जिने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने केवळ दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाही तर बॉलिवूडमध्ये लाखोंच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ती म्हणजे रकुलप्रीत सिंग होय. रकुलने दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ती सोमवारी (10 सप्टेंबर) तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे.
अशातच वाढदिवसाचे औचित्य साधून तिने तिच्या आयुष्यातील एक मोठी बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. तिने चित्रपट निर्माता जॅकी भगनानीसोबत असलेल्या तिच्या नात्याचा खुलासा केला आहे. रकुलने ही घोषणा केल्यानंतर तिचे चाहते हैराण झाले आहेत. तिने सोशल मीडियावर जॅकीसोबत एक फोटो शेअर करून कॅप्शन दिले आहे. (Rakul preet singh makes her relationship official with Jackky Bhagnani on her birthday)
रकुलने हा फोटो शेअर करून लिहिले आहे की, “धन्यवाद, या वर्षीचे माझे सगळ्यात मोठे गिफ्ट तुम्ही आहात. माझ्या आयुष्यात वेगवेगळे रंग भरल्यासाठी धन्यवाद, मला नेहमी हसविण्यासाठी धन्यवाद, तुम्ही जसे आहात तसेच राहिल्याबद्दल धन्यवाद, तुमच्यासोबत मला आणखी जास्त आठवणी तयार करायच्या आहेत जॅकी भगनानी.”
रकुल प्रीतने केलेल्या या पोस्टवर आयुष्मान खुराना, काजल अग्रवाल, राखी खन्ना, सोफी चौधरी तसेच बॉलिवूडमधील इतर कलाकारांनी देखील कमेंट केल्या आहे. तसेच दुसरीकडे जॅकी भगनानीने देखील फोटो शेअर करून लिहिले आहे की, “तुझ्याशिवाय दिवस दिवसासारखा वाटत नाही. तुझ्याशिवाय स्वादिष्ट जेवणाला देखील चव येत नाही. सगळ्यात सुंदर मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवत आहे, जी माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहे. आजचा तुझा दिवस तितकाच सुंदर जाओ जितकी तू आणि तुझी स्माईल सुंदर आहे. हॅपी बर्थडे माझी रकुलप्रीत.”
रकुलप्रीतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती या आधी अर्जुन कपूरसोबत ‘सरदार का ग्रँडसन’ या चित्रपटात दिसली होती. आता ती आयुष्मान खुरानासोबत ‘डॉक्टर जी’, जॉन अब्राहमसोबत ‘अटॅक’, अमिताभ बच्चन आणि अजय देवगनसोबत ‘मेडे’ आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘थॅंक गॉड’ या चित्रपटात दिसणार आहे. यासोबत ती लवकरच अक्षय कुमारसोबत एका चित्रपटात दिसणार असून, या चित्रपटाची निर्मिती जॅकी भगनानी करत आहेत.
हेही वाचा-
–लहानपणी जेष्ठ अभिनेत्री रेखा यांना ‘या’ कारणासाठी वाटायचा त्यांच्या बहिणींचा हेवा
–लग्नाच्या 6 महिन्यातच रेखा यांनी पती मुकेशकडे मागितला होता घटस्फोट, ‘या’ कारणामुळे पतीने केली होती आत्महत्या