आज आपल्या सर्वांच्या लाडक्या ‘मिस्टर बीन’ म्हणजेच रोवन एटकिंसन यांचा वाढदिवस आहे. ९० च्या दशकातील सर्वात जास्त लोकप्रिय शो ‘मिस्टर बीन’ हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा होता.
रोवन हे फक्त विनोदी अभिनेते नसून ते एक उत्तम लेखक देखील आहे. रोवन यांनी त्यांच्या अभिनयातून जगभरातील सर्वच प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. त्यांची ‘बीन’ ही भूमिका प्रचंड गाजली. आजही लोकं त्यांना ‘बीन’ म्हणूनच ओळखतात. असे नाही की त्यांनी ‘बीन’ च्या आधी किंवा नंतर कोणते काम केले नाही, तरीही लोकं त्यांना बीन म्हणूनच ओळखतात.

आजही मिस्टर बीन म्हटले की रोवन यांचाच चेहरा समोर येतो. ५ वर्ष चाललेल्या या शो ने रोवन यांना अपार लोकप्रियता मिळून दिली.
रोवन यांनी ‘मिस्टर बीन’ सोबत ‘ब्लैकेडर’, ‘नाइन ओ क्लॉक न्यूज’, ‘द सीक्रेट पुलिसमैन्स बॉल्स’, ‘द थिन ब्लू लाइन नाम’ नावाच्या अनेक टीव्ही शो मध्ये काम केले. रोवन यांनी ऑक्सफोर्ड च्या क्वींस कॉलेज मधून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगची पदवी संपादन केली.
काही काळ त्यांना लॉरी चालवण्याचा छंद जडला होता. ते अजूनही स्वतः जवळ लॉरी ड्राईवरचे लायसन्स ठेवतात. रोवन हे ‘रील’ लाइफ इतकेच किंबहुना जास्तच हसमुख आणि निर्मल मनाचे ‘रियल’ लाइफ मध्ये आहेत. त्यांना लोकांसोबत आणि त्यांच्या मित्रपरिवारासोबत वेळ घालवायला खूप आवडते.

साधारण दिसणारे रोवन एटकिंसन हे गडगंज संपत्तीचे मालक आहे. त्यांच्याकडे सुमारे ८ हजार करोड रुपयांची संपत्ती असल्याची माहिती आहे. रोवन हे ब्रिटनच्या सर्वात श्रीमंत लोकांमधील एक व्यक्ती आहे. त्यांची लोकप्रियता एखाद्या सुपरस्टार सारखी आहे.
ते लंडनमधील आलिशान महालासारख्या दिसणाऱ्या घराचे मालक आहे. प्रचंड पैसे असलेल्या रोवन यांच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. त्यांच्याकडे जगातील सर्वात महाग कार म्हणून ओळखली जाणारी ‘मैकलोरेन एफ१’ ही गाडी आहे. ह्या गाडीची आजची किंमत ८० ते १०० करोड रुपये इतकी आहे.

रोवन यांच्या अभिनयसाठी ब्रिटनच्या महाराणी यांनी २०१३ साली त्यांना ‘कमांडर ऑफ द मोस्ट एक्सेलेंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एंपायर’ या मोठ्या पुरास्काराने सन्मानित केले होते.










