Monday, July 8, 2024

…आणि रत्नागिरीत जन्म झालेल्या महाराष्ट्र कन्येने गाजवले टॉलीवूड, दिले असंख्य सुपर हिट सिनेमे

वाढदिवस खास : महाराष्ट्राला जन्मलेल्या आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या अभिनेत्री ‘सदा’चा आज वाढदिवस, जाणून घ्या तिच्याबद्दल.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव म्हणजे सदफ मोहम्मद सईद उर्फ सदा. सदा ही साऊथ सिनेसृष्टीतील मोठी अभिनेत्री आहे. आज सदा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

१७ फेब्रुवारी १९८४ ला मुंबईत सदाचा रत्नागिरी जिल्ह्यात जन्म झाला. सदाने २००२ साली तेलगू सिनेमा ‘जयम’ मधून भूमिका करत तिच्या अभिनयाची सुरुवात केली.

तिचा जयम सिनेमातील अभिनय खूपच उत्कृष्ट होता. पहिल्याच सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेयर पुरस्कार देखील मिळाला होता.

त्यानंतर २००५ साली तिने तामिळ सिनेमा ‘अन्नियन’ मधून भूमिका निभावत पुन्हा बॉक्स ऑफिसवर धूम उडवली. याच सिनेमात तिने सुपरस्टार विक्रम सोबत अभिनय केला.

सदाने तामिळ आणि तेलगू सिनेमांसोबतच मोना लीसा आणि मोहिनी ९८८६७८८८८८ या कन्नड सिनेमातही दमदार अभिनय केला.

सदाने सिनेमांसोबत अनेक रियालिटी शो मध्ये जज म्हणून देखील काम पहिले आहे.

सदा पूर्णतः शाकाहारी आहे. तिला प्राणी प्रचंड आवडतात. ती नेहमीच सर्वाना ‘प्राणी वाचवा आणि शाकाहारी व्हा’ असा सल्ला देत असते.

सोशल मीडियावर सदाला २ लाख फॉलोवर्स असून, ती सोशल मीडियावर सक्रिय सुद्धा आहे. नेहमी ती तिचे फोटो, व्हिडिओ आणि अपडेट फॅन्सला या माध्यमातून देताना दिसते.

हे देखील वाचा