Saturday, June 29, 2024

जेव्हा सानिया मिर्झाच्या नोझपिनमुळे भोजपुरीमध्ये उडाला गोंधळ, ‘या’ कलाकारांना खावी लागली होती जेलची हवा

अनेक महिलांना अभिमान वाटावा अशी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा सोमवारी (१५ नोव्हेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. सानियाने आजवर क्रीडा क्षेत्रात विलक्षणीय कामगिरी केली आहे. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी ती तिच्यातील कलागुणांनी चर्चेत आली. तसेच तिची नोझपिन आणि त्याने झालेले वादविवाद आजही अनेकांच्या चर्चेचा विषय आहेत. सानियाच्या आयुष्यातील याच चर्चेविषयी माहिती जाणून घेऊ.

पहिले तर सानिया तिच्या खेळामुळे चर्चेत आली. त्यानंतर तिने पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिक बरोबर लग्न केले, तेव्हा देखील तिची चर्चा सुरू होती आणि त्यानंतर तिची नोजपिन, भोजपुरी स्टार खेसरी लाल यादव आणि पवन सिंग यांच्यातील वाद तिच्या चर्चेचा विषय ठरले.

सानियामुळे खेसारी लालला खावी लागली जेलची हवा
खेसारी लाल यादव आज त्याच्या गाण्यांमुळे आणि अभिनयामुळे चांगलाच प्रकाश झोतात आहे. परंतु सानियावर बनवलेलं एक गाणं त्याला चांगलाच महागात पडलं होतं. सानियाने साल २०१० मध्ये शोएब मलिक या पाकिस्तानी खेळाडू बरोबर लग्न केले. तेव्हा खेसारी लाल यादवने तिच्यावर ‘टेनिस वाली सानिया दूल्हा खोजली पाकिस्तानी’ हे गाणं बनवले होते. सानियाला ही गोष्ट अजिबात पटली नाही. त्यामुळे तिने खेसारीवर मानहानीचा दावा केला होता. यामुळे त्याला तीन दिवस जेलची हवा देखील खावी लागली.

यानंतर काही दिवसांनी सानिया आणि खेसारी ‘यारों की बरात’ या कार्यक्रमात एकत्र दिसले होते. त्यावेळी दोघे एकमकांशी मजा मस्ती करताना पाहायला मिळाले. तसेच ज्या गाण्यावरून सानिया चिडली होती, त्याच गाण्यावर ती आणि खेसारी एकत्र थिरकताना दिसले. यावेळी दोघांचे असे म्हणणे होते की, “आम्ही भोजपुरी प्रेक्षकांच्या मनोरंजनााठी कायम तयार आहोत.”

पवन सिंगने सानियाच्या नोझपिनवर गायलं होतं गाणं
पवन सिंग त्याच्या संगीतातील कारकिर्दीच्या सुरुवातीला अल्बममध्ये गाणे गायचा. त्यावेळी त्याने सानियाच्या नोझपिनवर देखील एक गाणं गायलं होतं. त्याचं ‘सानिया मिर्जा कट नथुनिया जान मारेले’ हे गाणं त्यावेळी खूप गाजलं होतं. पण यामुळे तो वादात देखील सापडला होता. सानियाने पवनवर देखील गुन्हा दाखल केला होता. ज्यामुळे त्याला देखील एक दिवस जेलची हवा खावी लागली होती. मात्र पवन या गाण्यामुळे खूप लोकप्रिय झाला.

सानियाने आजवर क्रीडा क्षेत्रात मोठं नाव कमवून अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत. साल २००४ मध्ये तिने अर्जुन पुरस्कारावर स्वतःचे नाव कोरले. त्यानंतर साल २००६ मध्ये पद्मश्री आणि साल २०१६ मध्ये पद्मभूषण या पुरस्कारांनी तिला सन्मानित करण्यात आले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सलमान अन् राणीने ‘तेरी चुनरिया’वर केला जबरदस्त डान्स, चाहत्यांच्या आठवणी झाल्या ताज्या

-कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद

-मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी

हे देखील वाचा