Saturday, November 23, 2024
Home कॅलेंडर कॉमेडीचे शहेनशाह होते सतीश कौशिक, मिस्टर इंडिया ते साजन चले ससुराल, त्यांचे ‘हे’ चित्रपट कुणीच विसरू शकणार नाही

कॉमेडीचे शहेनशाह होते सतीश कौशिक, मिस्टर इंडिया ते साजन चले ससुराल, त्यांचे ‘हे’ चित्रपट कुणीच विसरू शकणार नाही

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी (दिनांक 9 मार्च) रोजी दुःखद निधन झाले. दिल्लीत गुडगाव येथे प्रवासादरम्यान त्यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेता आणि दिग्दर्शकाने सर्वांचाच निरोप घेतला. मात्र, सतीश कौशिक यांना त्यांचे चाहते आणि हिंदी सिनेसृष्टीवर प्रेम करणारा कोणताही व्यक्ती कधीच विसरु शकत नाही.

अभिनेता म्हणूनही सतीश कौशिक यांनी करियरमध्ये अनेक महत्त्वाची पात्रे साकारली. त्यांनी अनेक सहाय्यक भूमिकांसह खलनायकाच्या भूमिकाही साकारल्या आहेत. बहुतेक चित्रपटांत त्यांनी विनोदी अभिनेता म्हणून काम केले. त्यांच्या पाच सर्वोत्कृष्ट पात्रांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

मि. इंडिया-
या यादीत पहिले नाव ‘मि. इंडिया’ या चित्रपटाचे येते. या चित्रपटात त्याने कॅलेंडरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवी मुख्य भूमिकेत होते. चित्रपटातील त्याचे पात्र चांगलेच गाजले.

स्वर्ग-
सन 1990 साली आलेल्या ‘स्वर्ग’ चित्रपटातही त्यांनी अप्रतिम भूमिका साकारली. या चित्रपटात कौशिक हे गोविंदासोबत सहाय्यक भूमिकेत दिसले होता. यातील त्यांचे डायलॉगही मोठ्या प्रमाणात हिट ठरले.

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक काळाच्या पडद्याआड, बॉलिवूडवर शोककळा

साजन चले ससुराल-
सन 1997 मध्ये त्यांनी गोविंदा, तब्बू आणि करिश्मा कपूर अभिनित ‘साजन चले ससुराल’ मध्ये मुथु स्वामीची भूमिका साकारली होती. यातील सतीश कौशिकची व्यक्तिरेखा चांगलीच पसंत केली गेली. त्याची कॉमिक टायमिंग कमालीची होती.

मिस्टर अँड मिसेस खिलाडी-
सन 1997 मध्ये आलेला अक्षय कुमार अभिनीत ‘मिस्टर अँड मिसेस खिलाडी’ या चित्रपटात सतीश कौशिक यांनी ज्योतिषाची भूमिका साकारली होती. यात त्यांनी अक्षय कुमारच्या मामाची भूमिका साकारली होती.

देख तमाशा देख-
सन 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देख तमाशा देख’ या चित्रपटात सतीश कौशिक मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात सतीश यांनी मुथासेठची भूमिका साकारली होती. राजकारण आणि समाजात पसरलेल्या दुष्परिणामांवर हा चित्रपट आधारित होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
– सिद्धार्थला पूर्णतः विसरलीये शहनाझ गील; होळीच्या रंगात रंगली आणि अशी काय नाचली, तुम्हीच पाहा हा व्हिडिओ
– मसाबा गुप्ताने वडील व्हिव्हियन रिचर्ड्स यांना वाढदिवसानिमित दिल्या खास शुभेच्छा; म्हणाली पप्पा ‘तुम्ही चांगलं केलं…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा