Saturday, July 27, 2024

एकेकाळी अडखळत बोलणाऱ्या शरद केळकरने, आपल्या दमदार आवाजाने ‘बाहुबली’ला केले संपूर्ण भारतात प्रसिद्ध

बॉलिवूड किंवा ग्लॅमर, सिनेइंडस्ट्रीतील कलाकार पाहून अनेकदा आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. त्यांच्याकडे असणारा पैसा, प्रसिद्धी, आलिशान जीवन, लोकप्रियता आदी पाहून सर्वांचेच डोळे दिपून जातात. मात्र हे सर्व मिळवण्यासाठी ते अनेक गोष्टींचा त्याग करतात, मोठा संघर्ष, अजोड मेहनत आदींच्या बळावर ते यशस्वी होतात. मात्र या व्यतिरिक्त देखील असे काही कलाकार असतात जे स्वतःच्या व्यंगावर मात्र करत या इंडस्ट्रीकडे वळतात. असाच एक अभिनेता म्हणजे शरद केळकर. शरदने त्याच्या बोलताना अडखळण्याच्या त्रुटीवर मात करत तो या इंडस्ट्रीमध्ये आला आणि इथे तो एका अभिनेत्यासोबतच एक उत्कृष्ट व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट बनला. भारतातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या ‘बाहुबली’ सिनेमात बाहुबलीला आवाज देणाऱ्या शरदने तुफान लोकप्रियता मिळवली. टेलिव्हिजन अभिनेता ते बॉलिवूड कलाकार असा प्रवास करणारा शरद आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने प्रकाश टाकूया त्याच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टींवर.

शरद केळकरचा जन्म 7 ऑक्टोबर1976रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे मराठी कुटुंबात झाला. त्यांनी आपले संपूर्ण शिक्षण मध्यप्रदेशातूनच पूर्ण केले. शरद लहान असतांनाच त्याच्या वडिलांचे तो लहान असतानाच निधन झाले. त्यानंतर त्याच्या आईने आणि मोठ्या बहिणीनेच त्याचा सांभाळ केला. शरदने ग्वाल्हेरच्या प्रेस्टीज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर शरदने एका महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून काम केले. अगदी सुरुवातीपासूनच तो त्याच्या फिटनेसबद्दल सतर्क त्याच्या उत्तम फिटनेसमुळे तो खूप चर्चेत असायचा. सुरुवातीच्या काळात घराला हातभार लावण्यासाठी त्याने एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

एकदा शरद मुंबईमध्ये 7 दिवसांसाठी आला होता. तेव्हा त्याला अगदी शेवटच्या क्षणाला Grasim Mr India 2002 या स्पर्धेबद्दल समजले, आणि त्याने त्याचक्षणी त्याने त्या स्पर्धेत भाग घेतला. त्यावेळी शरद जीम ट्रेनर आणि एअरटेलमध्ये पार्ट टाईम जॉब करत होता. पुढे तो एका महिन्यात २५ शोमध्ये रॅम्पवॉक करत Grasim Mr. India finalist बनला. त्यानंतर 2004 साली शरदने ‘आक्रोश’ या दुरदर्शनवरील मालिकेतून इंडस्ट्रीत प्रवेश केला. 2004 मध्येच त्याला अक्षय खन्ना आणि करीनाच्या ‘हलचल’ या चित्रपटात शरद पाहुण्या कलाकाराची भूमिका करण्याची संधी मिळाली. मग त्याने पती,पत्नी और वो हा शो 2009 साली होस्ट केला.

शरदने टीव्ही सिरियलद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दूरदर्शनवरील मालिकेपासून सुरुवात करणाऱ्या शरदने ‘आक्रोश’, ‘सात फेरे’, ‘उतरन’, ‘कुछ तो लोग कहेंगे’ आणि ‘एजंट राघव’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. शरदने बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका करत चित्रपटांकडे मोर्चा वळवला. त्याने अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये काम केले यात एव्हिल रिटर्न, रामलीला, हाऊसफुल 4, लय भारी, भूमी आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. शरद त्याच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका मग त लहान असो किंवा मोठी इतकी ताकदीने करतो की, त्याबद्दल पुढचे अनेक दिवस चर्चा रंगतात. त्याने त्याच्या प्रभावी अभिनयाच्या जोरावर चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये वेगळे स्थान निर्माण केले.

त्याने त्याच्या करिअरमध्ये साकारलेली सरावात उत्तम भूमिका कोणती असे कोणालेली विचारले तरी त्याचे उत्तर एकच असेल, आणि ते म्हणजे ‘तान्हाजी’ सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका. मग दुसरी ‘लक्ष्मी’ चित्रपटातील तृतीयपंथीयाची भूमिका.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार शरदचा नेट वर्थ 5-10 मिलियन इतका असून सिनेमा, मालिका, वेबसिरीज, जाहिराती हे त्याच्या कमाईचे मुख्य स्रोत आहेत. यासोबतच तो व्हॉईस ओवर आर्टीस्ट म्हणूनही काम करतो.

मुख्य म्हणजे एका मुलाखतीमध्ये शरदने सांगितले होते की, तो लहान असतांना अडखळत बोलायचा. त्याला मुलं यावरून खूप चिडवायचे देखील. पुढे तो म्हणाल होता की, “मात्र आता माझ्याकडे पहा, मी अशा क्षेत्रात आहे जिथे मला माझे बोलण्याचे कौशल्यच वापरावे लागते.”

शरदच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्याने 2005 मध्ये त्याची सहकलाकार कीर्ती गायकवाड केळकरशी लग्न केले. शरदला एक ‘केशा’ नावाची मुलगीही आहे. दूरदर्शनच्या आक्रोश मालिकेदरम्यान दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती.

हेही नक्की वाचा-
चैत्या झाला मोठा! नागराज मंजुळेंनी शेअर केला ‘नाळ 2’चा टीझर
धैर्या, ढुंग्या आणि कबीरची नवी गोष्ट, ‘बॉईज 4’चा ट्रेलर प्रदर्शित; पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा