Wednesday, December 3, 2025
Home बॉलीवूड उत्कृष्ट अभिनयाने दशक गाजवणाऱ्या, प्रतिभावान स्मिता पाटील यांच्या 5 अविस्मरणीय भूमिकांना आज देऊयात उजाळा

उत्कृष्ट अभिनयाने दशक गाजवणाऱ्या, प्रतिभावान स्मिता पाटील यांच्या 5 अविस्मरणीय भूमिकांना आज देऊयात उजाळा

चित्रपटसृष्टीत स्मिता पाटील कारकीर्द भलेही मोठी नव्हती, पण त्यांनी 10 वर्षाच्या कारकिर्दीत चाहत्यांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडली. भावनिक डोळे, हृदयस्पर्शी हास्य आणि दर्जेदार अभिनयाने त्यांनी प्रत्येक वेळी दर्शकांना पद्यावर खिळवून ठेवले. टीव्ही न्यूजरीडर पासून चित्रपटसृष्टीतील एक हरहुन्नरी अभिनेत्री हा प्रवास त्यांनी अगदी आपल्या अभिनयाप्रमाणे सहग आखला. ‘भूमिका’ या आपल्या पहिल्या चित्रपटापासून ते नमक हलाल आणि मिर्च मसालापर्यंतच्या त्यांच्या प्रत्येक चित्रपटासोबत त्या कायमच इंडस्ट्रीमधील सर्वात आवडत्या अभिनेत्रींपैकी एक राहिल्या.

नमक हलाल
नमक हलाल हा प्रकाश मेहरा दिग्दर्शित एक विनोदी चित्रपट. या चित्रपटात अमिताभ बच्चन, स्मिता पाटील, परवीन बाबी, शशी कपूर आणि वहीदा रहमान मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचा तामिळमध्ये वेलईकरण नावाने रीमेक झाला. ‘पग घुंघरू बांध’, ‘रात बाकी बात बाकी’ आणि ‘आज रपट जाएं तो’ ही गाणी 80 च्या दशकात खूप लोकप्रिय झाली होती. (happy birthday smita patil 5 unforgettable films of this brilliant actress)

आक्रोश
गोविंद निहलानी दिग्दर्शितआक्रोश यामध्ये नसीरुद्दीन शाह, स्मिता पाटील, अमरीश पुरी आणि ओम पुरी यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पिकॉक, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भारतीय पुरस्कार; सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळवले.

मिर्च मसाला
केतन मेहता दिग्दर्शित मिर्च मसाला, या चित्रपटात स्मिता पाटील आणि नसीरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत होते. चित्रपटातल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर फोर्ब्सने स्मिता पाटील यांच्या अभिनयाचा समावेश ‘भारतीय चित्रपटसृष्टीतील 25 सर्वोत्कृष्ट अभिनय’ या यादीमध्ये केला. त्यांच्या मृत्यूपूर्वीचा हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

उंबरठा
जंबर पटेल दिग्दर्शित उंबरठा हा मराठी चित्रपट उत्तम कथा, अफलातून अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शिनाचा नमुना आहे. या चित्रपटात स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटासाठी सिमता पाटील यांना मराठी राज्य चित्रपट पुरस्काराचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या सर्वात उल्लेखनीय भूमिकांपैकी ही एक होती.

भूमिका
श्याम बेनेगल यांचे दिग्दर्शन असलेलाभूमिका हा चित्रपट आजही अनेकांच्या आठवणीत आहे. या चित्रपटात स्मिता पाटील, अमोल पालेकर, अनंत नाग, नसीरुद्दीन शाह आणि अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट मराठी अभिनेत्री ‘हंसा वाडकर’ यांच्या जीवनावर आधारित होता,

चित्रपटासाठी स्मिता पाटील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

हेही वाचा-
पुणेकर स्मिता पाटीलच्या ‘या’ 3 इच्छा राहिल्या अपूर्ण, वाचा कोणत्या आहेत ‘त्या’ इच्छा
Bharat Jadhav birthday: ‘या’ बसमध्ये बसले होते मराठी कलाकर; भरत जाधव यांनी सांगितला अनुभव, म्हणाला..

हे देखील वाचा