Wednesday, July 3, 2024

अनेक नोकऱ्यांना लाथ मारून विकी कौशलने धरली अभिनयाची वाट, आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार

अभिनेता विकी कौशलने आपल्या शानदार अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये आपले खास स्थान बनवले आहे. त्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. मंगळवारी (16 मे) सर्वोत्कृष्ठ अभिनेता विकी कौशल आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने आपण अभिनेत्याच्या जीवनाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…

विकी कौशल महिला चाहत्यांमध्ये त्याच्या रफ आणि टफ लूकसाठी खूप प्रसिद्ध आहे. देशभरातून विकीचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. विकीचा जन्म 16 मे, 1988मध्ये मुंबईतील एका चाळीत झाला होता. हे फार कमी लोकांना माहित आहे की, तो बॉलिवूड स्टंटमॅन शाम कौशल यांचा मुलगा आहे. जेव्हा शाम कौशल यांना बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले होते, तेव्हा विकीने नोकरी करावी, अशी अपेक्षा ते करत होते. विकी त्यावेळी इंजिनीअरिंग करत होता. माध्यमांच्या माहितीनुसार, स्वतः विकीने याबद्दल सांगितले होते की, वडिलांना वाटायचे की, विकीने चांगली नोकरी करावी, आणि आपली कारकीर्द निश्चित केली पाहिजे.

विकीने इंजिनीअरिंगचा अभ्यास केला असला, तरीही त्याची आवड नेहमीच अभिनयात होती. त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अनेक नोकर्‍यांना लाथ मारल्यानंतर म्हणजेच नाकारल्यानंतर, विकी अभिनयाकडे वळला, आणि त्यासाठी प्रशिक्षण सुरू केले. किशोर नमित कपूर यांच्या अभिनय अकादमीमध्ये त्याने अभिनयाचा अभ्यास केला होता. त्यानंतर त्याला अनुराग कश्यपसोबत काम करण्याची संधी मिळाली. ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून होता.

सन 2015या वर्षाला विकीच्या आयुष्यात विशेष महत्त्व आहे, कारण त्यावर्षी त्याच्या ‘मसान’ या चित्रपटाद्वारे त्याला अभिनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटामध्ये विकीची मुख्य भूमिका होती, जी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. प्रेक्षकांनी त्याच्यातले कौशल्य ओळखले होते. लवकरच तो इतर चित्रपट निर्मात्यांच्या नजरेत आला होता. यानंतर विकीला बर्‍याच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती.

त्यानंतर विकीचा ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाने विकीला लोकप्रियतेच्या शिखरावर  पोहोचवले आहे. 2019च्या या वर्षात विकीने या चित्रपटात, मुख्य भूमिका साकारून सर्वांची मने जिंकली होती. चित्रपटात त्याने मेजर विहान शेरगिलची भूमिका केली होती. तसेच ‘राजी’ या चितपटातुनपण त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्याच्या उत्त्तम कामगिरीमुळे, विकीचे नाव आज मोठ्या अभिनेत्यांसोबत घेतले जाते.(happy birthday vicky kaushal took acting stance after rejecting many jobs today bollywoods top actor)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माधुरी दीक्षितच्या घरी चाहत्याचा भन्नाट किस्सा, दत्तक घ्या म्हणत सामान घेऊन आला होता घरी
तेजस्वी प्रकाशचा बाेल्ड अंदाज पाहून चाहते घायळ

हे देखील वाचा