बॉलिवूडमध्ये आपल्या उत्कृष्ठ अभिनयाच्या जोरावर आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन (Vidya Balan) होय. सातवीत शिकत असताना जेव्हा विद्याने अभिनेत्री माधुरी दीक्षितला (Madhuri Dixit) ‘तेजाब’ चित्रपटात डान्स करताना पाहिले, तेव्हा अभिनेत्री होण्याचे स्वप्न तिच्या मनात आले. विद्याने वयाच्या 16 व्या वर्षी एकता कपूरच्या टीव्ही सीरियल ‘हम पांच’मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. परंतु विद्याला तिचे करिअर चित्रपटांमध्ये करायचे होते. मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये अनेक प्रयत्न करूनही ती अपयशी ठरली. विद्या रविवारी (1 जानेवारी) तिचा 44वा वाढदिवस साजरा करत आहे.
पहिल्याच चित्रपटात मिळाली मोहनलालसोबत काम करण्याची संधी
विद्याचा जन्म 1 जानेवारी 1979 रोजी मुंबईत झाला. जेव्हा विद्या सुरुवातीला चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी संघर्ष करत होती. तेव्हा तिला दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता मोहनलालसोबत (Mohanlal) मल्याळम चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मात्र, हा चित्रपट काही कारणास्तव रखडला आणि यासाठी विद्याला जबाबदार धरण्यात आले आणि तिला वाईटही म्हटले गेले.
विद्याला तिच्या शरीराचा वाटत होता तिरस्कार
विद्याला एकेकाळी तिच्या शरीराचा खूप तिरस्कार वाटत होता. खरंतर विद्याला तिच्या बॉडीसाठी एवढी ट्रोल करण्यात आले की, तिला तिच्या शरीराचा तिरस्कार होऊ लागला. तिने सांगितले होते, “मला स्वतःवरच संशय येऊ लागला होता. मी माझ्या शरीराशी प्रदीर्घ लढा दिला आहे. मला खूप राग यायचा आणि माझ्या शरीराचा तिरस्कारही वाटायचा.” विद्या म्हणाली की, “वजन कमी केल्यानंतरही आयुष्यात अनेक प्रसंगी मला असे वाटले की, मला कोणीही पूर्णपणे स्वीकारले नाही आणि त्यामुळे दुसऱ्याच्या दृष्टीकोनातून स्वतःला बदलण्याची गरज नाही.” लोकांच्या छोट्या विचारांना ती जबाबदार नसल्याचे विद्या सांगते.
विद्या बालन झी टीव्हीच्या कॉमेडी शो ‘हम पांच’मध्ये राधिका माथूरच्या भूमिकेत दिसली होती. पण तिला फारशी ओळख मिळाली नाही. दरम्यान, तिला ‘परिणीता’ हा चित्रपट मिळाला, त्यानंतर सर्व काही बदलले. ‘हे बेबी’ आणि ‘किस्मत कनेक्शन’ या चित्रपटांमधील तिचे वाढलेले वजन आणि विद्याच्या आउटफिटमुळे तिच्यावर खूप टीका झाली होती. यामुळे विद्या इतकी निराश झाली की, तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णयही घेतला.
साकारली अडल्ट भूमिका
‘द डर्टी पिक्चर’ 2011 मध्ये आलेल्या या चित्रपटाने विद्याचे नशीबच बदलून टाकले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. विद्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, “डर्टी पिक्चरमध्ये सिल्क स्मिताची भूमिका साकारणे माझ्यासाठी थोडे कठीण होते. आम्हा दोघांचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे भिन्न होते.”
विद्याने 2012 मध्ये चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरशी लग्न केले. माध्यमांतील वृत्तानुसार, आज ती सुमारे 188 कोटींची मालकीण आहे. 2020 पर्यंत विद्या बालनची एकूण संपत्ती $२७ मिलियन इतकी आहे. यासोबतच तिच्याकडे देशातील अनेक रिअल इस्टेट मालमत्ता आहेत.(happy birthday vidya balan lesser known facts about dirty picture actress)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा सोनाली बेंद्रेने पैशासाठी केले होते ‘अशा’ चित्रपटात काम, स्वतः केला खुलासा | sonali bendre
तिच्या निरागस चेहऱ्यावर आजही कोट्यवधी चाहते प्रेम करतात; या सुप्रसिद्ध ‘राज’कारणीसोबत जोडलं होतं नाव