Sunday, May 19, 2024

तिच्या निरागस चेहऱ्यावर आजही कोट्यवधी चाहते प्रेम करतात; या सुप्रसिद्ध ‘राज’कारणीसोबत जोडलं होतं नाव

बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक मराठी कलाकारांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही कलाकार तर हिंदी आणि मराठी या दोन्ही चित्रपटसृष्टीमध्ये एकाच वेळी काम करतात. तर असेही काही मराठी कलाकार आहेत ज्यांनी फक्त हिंदीत काम केलं आहे. मराठीमध्ये त्यांनी तितकंसं काम केलेलं नाही.

अनेक वर्षे हिंदीत गाजवल्यानंतर ते आता कुठे मराठीमध्ये पदार्पण करू लागले आहेत. तर अशा कलाकारांची यादी खूप मोठी आहे. याच कलाकारांपैकी एक असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचा १ जानेवारी हा जन्मदिवस. सोनाली बेंद्रेंच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्या काही माहीत नसलेल्या गोष्टींवर नजर टाकणार आहोत.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आपल्या काळात कोट्यवधी लोकांची मने जिंकली आहेत. आजही लोक सोनालीच्या निरागस चेहर्‍यावर प्रेम करतात. सोनालीचा जन्म 1 जानेवारी 1975 रोजी झाला होता. सोनालीने 1 जानेवारीला तिचा 47वा वाढदिवस साजरा केला. सोनालीने बॉलिवूडमध्ये आजवर अनेक चित्रपट केले आहेत. आणि तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.

Sonali Bendre New
Sonali Bendre New

सोनालीचा जन्म मुंबईत झाला. तिने मुंबईतील रामनारायण रुईया कॉलेजमधून तिचं शिक्षण घेतलं. सोनालीला कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंगमध्ये रस होता. तिने मॉडेलिंगच्या कारकीर्दीची सुरूवात 1994 मध्ये केली होती. सोनालीच्या सौंदर्यामुळे तिला चित्रपटांमध्येही काम मिळालं.

सोहेल खान प्रॉडक्शन मध्ये तयार होणाऱ्या ‘राम’ या चित्रपटासाठी सोनालीला पहिल्यांदा ऑफर आली होती. पण काही कारणास्तव हा चित्रपट बनू शकला नाही.

सोनालीच्या कारकीर्दीत यामुळे फारसा फरक पडला नाही. यानंतर सोनालीने 1995 मध्ये ‘आग’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तीच्यासोबत सुपरस्टार गोविंदा दिसला होता. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकला नाही. यानंतर सोनाली 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिलजाले’ या चित्रपटात झळकली.

या चित्रपटात सोनालीसह अभिनेता अजय देवगन याने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील सोनालीच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सोनालीने यानंतर हम साथ साथ है, सरफरोश, डुप्लिकेट, जिस देश मे गंगा रहता है, अशा हिंदी सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. या सोबतच तिने केदार शिंदेच्या अगं बाई अरेच्चा! या एकमेव मराठी सिनेमात आयटम सॉंगवर डांस केला होता.

Sonali Bandre & Raj Thakre
Sonali Bandre & Raj Thakre

सोनालीच्या चित्रपट करकीर्दीसोबतच तिचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत आलं होतं. सोनाली बेंद्रे प्रसिद्ध राजकारणी राज ठाकरे यांच्या प्रेमात पडली. असं म्हणतात की, राज ठाकरेही सोनालीच्या प्रेमात पडले होते. राज ठाकरे सोनालीच्या प्रेमात इतके मग्न झाले होते की, त्यांना सोनालीशी लग्न करायचं होतं. पण राज आधीच विवाहित होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी राज ठाकरे यांना सोनालीशी लग्न करण्यास नकार दिला होता आणि इथेच या प्रेमकथेचा अंत झाला होता.

सोनालीने 12 नोव्हेंबर 2002 मध्ये चित्रपट दिग्दर्शक गोल्डी बहलशी लग्न केलं. सोनाली आणि गोल्डी यांना एक मुलगा देखील आहे. ज्याचं नाव त्यांनी रणवीर ठेवलं आहे. जुलै 2018 मध्ये जेव्हा सोनालीला कर्करोगाचं निदान झालं होतं. तेव्हा अनेकांच्या काळजात धस्स झालं होतं.

Sonali Bendre Familly
Sonali Bendre Familly

कर्करोगाच्या निदानाबाबत स्वत: सोनालीने माहिती दिली होती. यानंतर कित्येक महिन्यांपासून तिच्यावर अमेरिकेत उपचार सुरु होते. आज सोनाली यातून पूर्णपणे बरी झाली असून ती अगदी ठणठणीत आहे.(sonali bendre birthday special know some unknown facts about actress and her love life)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
आमिर खानसोबत ‘सरफरोश’ चित्रपटात दिसली होती सोनाली बेंद्रे, मात्र आजही होतो ‘याचा’ पश्चात्ताप

Birthday Special: सुनील शेट्टीला केलं होतं प्रपोज, पण ‘या’ दिग्दर्शकासोबत थाटला सोनाली बेंद्रेने संसार

हे देखील वाचा