मंडळी आपल्याकडे भारतीय सिनेसृष्टीमध्ये फार कमी चित्रपट असे येतात की त्यांच्या सिक्वेलची प्रेक्षक चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. आपल्याकडे फार कमी असे चित्रपट आले आहेत म्हणजे बाहुबली २ या सिनेमानंतर जर कोणत्या चित्रपटाच्या सिक्वेलची इतकी प्रतीक्षा प्रेक्षकांनी केली असेल तर तो सिनेमा आहे केजीएफ २!
केजीएफ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. त्यावेळी चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांना केजीएफ २ ची उत्सुकता लागली होती. जे जे या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. काही तासांपूर्वीच केजीएफ २ चा टिझर युट्युबवर प्रदर्शित झाला आहे. परंतु या चित्रपटाच्या टिझरच्या प्रदर्शनाबाबतही एक घटना घडली आहे. नेमकं काय घडलं आहे चला पाहुयात.
अभिनेता यशच्या वाढदिवसाच्या अगदी अगोदर केजीएफ चॅप्टर २ या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. यशचे फॅन्स चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाच्या टीमने ट्रेलरची लिंक सोशल मीडियावर शेअर केली आहे. परंतु अशी चर्चा आहे की या चित्रपटाचा टिझर लीक झाला आहे. एका व्हिडिओमध्ये यशने चाहत्यांना सांगितलं की, ‘असे काही लोक आहेत ज्यांनी चित्रपटाचा टिझर लीक केला आहे. मला याचं कारण माहित नाही आणि मला याची चिंताही नाही. मी त्यांना शुभेच्छा देतो, परंतु मला हे माहित आहे की तुमच्यातील काहींनी बर्याच योजना आखल्या आहेत. अचानक टीझर रिलीझ झाल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आमच्या चित्रपटाचा टिझर पहा आणि आम्हाला असंच प्रोत्साहित करा.’
हा चित्रपट उन्हाळ्यामध्ये रिलीज होणार आहे आणि हा टीझर या चित्रपटाची पहिली झलक आहे. सुपरस्टार यश व्यतिरिक्त अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी, बॉलिवूड स्टार संजय दत्त आणि बॉलिवूडची अभिनेत्री रवीना टंडनदेखील या चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसली आहे. या सिनेमात संजय दत्त आणि रवीना टंडन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा टिझर रिलीज झाल्यानंतर फक्त काही तासांतच या टिझरला ५६ मिलियनहुन अधिक व्ह्यूज आल्या असून सध्या हा टिझर युट्युबवर क्रमांक १ वर ट्रेंड होत आहे.
बहुप्रतिक्षित केजीएफ चॅप्टर २ या चित्रपटाचा टीझर गुरुवारी रिलीज झाला आहे. हा टिझर अधिकृतरित्या प्रदर्शित करण्याच्या काही तास आधी लीक झाला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या ३५ व्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर टीझर शुक्रवारी सकाळी १०.१६ या वेळेत प्रदर्शित होणार होता. परंतु, लीक झाल्यामुळे तो वेळेआधीच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात रॉकीने आपल्या मृत पावलेल्या आईला गरीबीने मरणार नाही या दिलेल्या वचनसह सिक्वेलच्या टीझरची सुरूवात होते.