Monday, June 9, 2025
Home अन्य गोड बातमी! लवकरच आई होणार ‘कुमकुम भाग्य’ फेम अंकित मोहनची पत्नी रुचि सवर्ण

गोड बातमी! लवकरच आई होणार ‘कुमकुम भाग्य’ फेम अंकित मोहनची पत्नी रुचि सवर्ण

एखादं लहान मूल जन्माला घालणे, त्याला वाढवणे, त्याच्यावर सर्व चांगले संस्कार करणे, या सर्व गोष्टी प्रत्येक आई- वडील पार पाडत असतात. यामध्ये दोघांवरही आपल्या बाळाच्या भविष्याची जबाबदारी असते. कारण जन्माला येणारे बाळ हे उद्या या भारतासाठी, आपल्या समाजासाठी एक उत्तम नागरिक बनणार असते. प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यामध्ये आपल्या बाळाचे स्वागत करणे हा खूप महत्वाचा आणि सुखाचा क्षण असतो. त्यासाठी दोघेही खूप उत्सुक असतात. अशात अभिनेता अंकित मोहन लवकरच बाबा होणार आहे.

‘कुमकुम भाग्य’ या मालिकेतील अभिनेता अंकितने साल २०१५ मध्ये रुचि सवर्णबरोबर विवाह केला. ते दोघेही आपल्या आयुष्यात खूप सुखी असून लवकरच एका बाळाला जन्म देणार आहेत. त्याने ही माहिती गेल्या शनिवारी त्याच्या चाहत्यांना दिली. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या पत्नीबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये ते दोघेही खूप छान दिसत आहेत. तसेच दोघांनी देखील पिवळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. त्यांच्या या फोटोला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. दोघेही या फोटोमध्ये खूप खुश दिसत आहेत. चाहत्यांनी त्यांना कमेंट करत बाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Happy news: Ruchi Savarna, wife of Ankit Mohan is going to be a mother soon)

अभिनेत्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो लवकरच बाबा होणार आहे याचा खुलासा केला. अंकित म्हणाला की, “मी आणि माझी पत्नी रुचि लवकरच आई- बाबा होणार आहोत. आम्हाला दोघांनाही यामुळे खूप छान वाटत आहे. आमच्या आयुष्यातील हा खूप वेगळा आणि खास क्षण आहे.”

मुलाखतीमध्ये तो पुढे म्हणाला की, “लहान मुलांना कसे सांभाळायचे हे मला माहित आहे. मी या आधी माझ्या भाचा आणि भाचीचा काळजी घेतली आहे. लहान मुलांना देखील माझ्याबरोबर राहायला आवडते. कारण मी जेव्हा लहान मुलांमध्ये असतो, तेव्हा अगदी त्यांच्यासारखा लहान होऊन वागतो.”

अंकितने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “आम्ही खूप दिवसांपासून ही गोड बातमी चाहत्यांना सांगण्याचा विचार करत होतो. मग आम्ही ठरवले की, बाप्पाच्या आगमनावेळी आपण ही बातमी सर्वांना सांगू.” त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये मागे गणरायाची मूर्ती आहे. गणरायाच्या आगमनाने आणि त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन पाहुण्याने या दोघांचे मन बहरुन आले आहे.

सोशल मीडियावर देखील अंकित आणि रुचिचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या लग्नापासून हे जोडपे त्यांच्या रोमँटिक अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते. सध्या गणरायाच्या सेवेमध्ये दोघेही सज्ज झाले आहेत. अंकितने त्याच्या घरी छोटा पाहुना येणार म्हणून गणरायाची इकोफ्रेंडली मूर्ती देखील स्वतः बनवली. त्याने शुक्रवारी (१० सप्टेंबर) तो व्हिडिओ स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली. यामध्ये तो स्वतः बाप्पाच्या मूर्तीला सजवताना दिसत होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ट्रोलर्सवर गरजली अर्शी खान, गणरायाच्या पूजेचे ‘हे’ फोटो केले होते पोस्ट

-‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकांनी दिलाय जगाला निरोप; कोणी केली आत्महत्या, तर कोणाला आला हार्ट अटॅक

-कंगना नव्हे, तर ऐश्वर्याला ‘थलायवी’मध्ये पाहू इच्छित होत्या जयललिता; सिमी गरेवालने केला खुलासा

हे देखील वाचा