Saturday, June 29, 2024

आयुष्यातील खऱ्या शिक्षकाची कहाणी दाखवणारे हे बॉलिवूड सिनेमे एकदा पाहाच

आपल्या आयुष्यात पुढे जाणयासाठी मार्ग दाखवायला आणि मार्गदर्शन करायला एक शिक्षक असतोच. शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना सगळेच आपले शिक्षक असतात परंतु त्यानंतर देखील प्रत्येक वळणावर आपल्याला कोणी ना कोणी शिक्षक म्हणून मिळत असते. अशातच आज म्हणजेच सोमवारी (५ सप्टेंबर) रोजी आपण शिक्षक दिन साजरा करत आहोत. देशाचे दुसरे राष्ट्रपती आणि भारताचे पहिले शिक्षण मंत्री डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. आज, संपूर्ण देश त्यांच्या संबंधित गुरू, शिक्षक, प्रशिक्षकांसह शिकवणाऱ्या व्यक्तीचा आदर करतो आणि साजरा करतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यात त्याची मदत होते. बॉलीवूडमध्येही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सुंदर नाते दाखवण्यात आले आहे. जाणून घेऊया अशाच 5 चित्रपटांबद्दल सांगत आहोत.

सुपर 30
हृतिक रोशन आणि मृणाल ठाकूर स्टारर ‘सुपर 30’ या क्रमात सर्वात वर येतो चित्रपटात हृतिकने गणितज्ञ आनंद कुमार यांची भूमिका साकारली आहे, जो मागासवर्गीय 30 IIT इच्छुकांना शिकवतो. चित्रपटात हृतिकने आनंदच्या भूमिकेत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अनोखे बंध दाखवले आहेत.

हिचकी
राणी मुखर्जी स्टारर या चित्रपटात राणी एका शिक्षिकेच्या भूमिकेत दिसली होती. ती एका शाळेत मागासलेल्या आणि गरीब विद्यार्थ्यांना शिकवते. शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांचे जीवन चांगलेच बदलू शकते हे दाखवून दिले.

३ इडियट्स
आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी स्टारर ‘3 इडियट्स’ हा भारतीय शिक्षण व्यवस्था विनोदी शैलीत दाखवतो. चित्रपटाच्या सुरुवातीला मुख्य पात्र रँचो आणि प्रोफेसर वीरू सहस्रबुद्धे यांच्यात चांगले संबंध नव्हते, पण नंतर रँचो प्रोफेसरची मानसिकता बदलते.

निल बट्टे सन्नाटा
स्वरा भास्कर स्टारर या चित्रपटात शिक्षक-विद्यार्थी तसेच आई-मुलीचे नाते दाखवण्यात आले आहे. स्वर या चित्रपटात आईच्या भूमिकेत असून तिच्या मुलीला गुरूप्रमाणे मार्गदर्शन करते आणि तिची मुलगी आयएएस बनते.

तारे जमीन पर
आमिर खान स्टारर या चित्रपटात दर्शील सफारीचीही महत्त्वाची भूमिका होती. यामध्ये दर्शील डिस्लेक्सियाशी झुंजत आहे. आमिरने रामशंकर निकुंभ नावाच्या एका विशेष शिक्षकाची भूमिका साकारली आहे, तर दर्शीने इशान अवस्थीची भूमिका साकारली आहे. रामशंकर इशानला अभ्यासात मदत करतो, त्याला समजून घेतो.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुटुंबापासून लपून-छपून अभिनेता बनला कार्तिक, नववीत असताना ‘या’ खानचा सिनेमा बघून मनाशी केलेलं पक्कं

‘या’ अभिनेत्रीच्या मदतीमुळे कर्जमुक्त झाले दीपेश भानचे कुटुंब, आभार मानत पत्नी म्हणाली…
बापरे! अनन्या पांडेने लग्नाबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाली, ‘मी तीन तीन…’

हे देखील वाचा