Friday, April 25, 2025
Home टेलिव्हिजन ‘या’ अभिनेत्रीच्या मदतीमुळे कर्जमुक्त झाले दीपेश भानचे कुटुंब, आभार मानत पत्नी म्हणाली…

‘या’ अभिनेत्रीच्या मदतीमुळे कर्जमुक्त झाले दीपेश भानचे कुटुंब, आभार मानत पत्नी म्हणाली…

छाेट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘भाबी जी घर पर है’ यातील प्रसिद्ध अभिनेता दीपेश भान याचे 23 जुलै, 2022 राेजी ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले होते. दीपेशच्या निधनामुळे एकीकडे त्याच्या पत्नीवर मुलाची जबाबदारी आली होती, तर दुसरीकडे घरासाठी घेतलेल कर्ज या सगळ्याचा भार होता. गेल्या दिवसात या सगळ्याचा उल्लेख अभिनेत्री सौम्या टंडन अनेकदा करताना दिसली. आता साैम्यामुळे दीपेश भानच्या पत्नीची मोठी समस्या दूर झालीये.

सौम्या टंडन (Saumya Tandon) हिच्या मदतीने दीपेश भान (Deepesh Bhan) याच्या कुटुंबाने अवघ्या एका महिन्यात घरावरचे कर्ज फेडले. झाले असे की, गेल्या महिन्यात सौम्याने सोशल मीडियावरून दीपेश भानच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत मागत दान करण्याची मागणी केली हाेती. अभिनेत्रीची ही याेजना यशस्वी ठरली. दीपेश भानच्या पत्नीने एक व्हिडिओ शेअर करत कर्जमुक्त झाल्याचीही माहिती दिली.

नेहाने दिवंगत पती दीपेशच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने घरावरचे कर्ज फेडल्याचे सांगितले आहे. व्हिडिओमध्ये नेहाने सौम्या टंडनचेही आभार मानले आहेत. या व्हिडिओमध्ये तिने सांगितले की, सौम्या व्यतिरिक्त ‘भाबी जी घर पर हैं’ या मालिकेचे निर्माते बेनिफर कोहली यांनी देखील मदत केली. या सगळ्यांच्या मदतीने ती लाखो रुपयांचे कर्ज फेडू शकण्यात यशस्वी ठरली.

दीपेश भान याने मुंबईमध्ये घर घेण्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेतलं होतं. मात्र, घर घेतल्यानंतर काही दिवसातच त्याचे निधन झाले. त्यानंतर सौम्या टंडनने आपल्या फॉलोव्हर्सला 50 लाख रुपये जमा करण्याचे आवाहन केले होते. यादरम्यान अभिनेत्रीने हेही सांगितले की, दीपेश भानच्या पत्नीला एक छाेटा मुलगा देखील आहे, ज्चाचे पालन- पाेषण तिला एकटीला करायचे आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
मूर्ती लहान, कीर्ती महान! नववीत शिकणाऱ्या पठ्ठ्या बनला विजेता, ट्रॉफीसह ‘एवढे’ लाखही जिंकला
जगासाठी खलनायक लेकीसाठी हिरो! शक्ति कपूर यांच्या वाढदिवशी श्रद्धा कपूरची स्पेशल पोस्ट

या 10 अभिनेत्रींनी दाखवून दिले वय म्हणजे फक्त आकडा, आजही गाजवतायेत ओटीटी प्लॅटफॉर्म

हे देखील वाचा