‘मिस्टर बिन’ अशी ओळख असलेल्या रोवन एटकिन्सन यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठी घोषणा केली आहे. रोवन हे यापुढे मिस्टर बीन हे पात्र साकारणार नसल्यचे त्यांनी जाहीर केले आहे.
वाढदिवशीच त्यांनी त्यांच्या अजरामर अशा मिस्टर बिन पात्राला कायमचा अलविदा केला आहे. त्यांच्या या घोषणेमुळे फॅन्सचा हिरमोड झाला आहे.
रोवन यांनी ही घोषणा करताना सांगितले की, “मला आता मिस्टर बिन हे पात्र साकारण्यास मजा नाही. ‘बीन’ हे पात्र तणावपूर्ण आणि थकवणारे आहे. त्यामुळे ते पात्र अधिक जबाबदारीने साकारावे लागते. आता ह्या पात्रात पूर्वीइतकी मजा राहिली नाहीये. त्यामुळे यापुढे मी मिस्टर बिन हे पात्र आता साकारणार नाही. हे पात्र आता थांबायला हवे.”

सन १९९० मिस्टर बिन हे पात्र पहिल्यांदा टीव्हीवर झळकले होते. परदेशात प्रसिद्ध असलेले मिस्टर बिन भारतातही तितकेच लोकप्रिय ठरले. हे पात्र किती लोकप्रिय आहे, त्याचा अंदाज फेसबकवरुनही येऊ शकतो. कारण जगभरातील प्रसिद्ध फेसबुक पेजमध्ये मिस्टर बिन हे पेज सर्वाधिक लाईक्स मिळवणाऱ्यांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे.
साधारण दिसणारे रोवन एटकिंसन हे गडगंज संपत्तीचे मालक आहे. त्यांच्याकडे सुमारे ८ हजार करोड रुपयांची संपत्ती असल्याची माहिती आहे. रोवन हे ब्रिटनच्या सर्वात श्रीमंत लोकांमधील एक व्यक्ती आहे. त्यांची लोकप्रियता एखाद्या सुपरस्टार सारखी आहे. ते लंडनमधील आलिशान महालासारख्या दिसणाऱ्या घराचे मालक आहे.

प्रचंड पैसा असलेल्या रोवन यांच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. त्यांच्याकडे जगातील सर्वात महाग कार म्हणून ओळखली जाणारी ‘मैकलोरेन एफ१’ ही गाडी आहे. ह्या गाडीची आजची किंमत ८० ते १०० करोड रुपये इतकी आहे.
रोवन यांच्या भिनयसाठी ब्रिटनच्या महाराणी यांनी २०१३ साली त्यांना ‘कमांडर ऑफ द मोस्ट एक्सेलेंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एंपायर’ या मोठ्या पुरास्काराने सन्मानित केले होते.










