Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

स्वराज्यात सामील व्हा, नाहीतर मरा! ‘हर हर महदेव’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यकथेवर आधारित ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर पाहून चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.आता या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमधील दमदार डायलॉग ऐकून चित्रपट पाहण्याची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठीसोबतचं हिंदी, तामिळ, तेलगु, कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका शरद केळकर(Sharad Kelkar) तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सुबोध भावे(Subodh Bhave) साकारणार आहे.

या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते सुबोध भावे यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘स्वराज्य उभं राहतं ते कर्तव्याच्या तकलादू भितींवर नाही तर त्यासाठी लागतो इमानाचा काळा दगड!’ सादर करत आहोत स्वराज्याच्या निष्ठेची, बलाढ्य शक्तीची, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमांच्या गाथेची झलक….येतोय ‘हर हर महादेव’ 25 ऑक्टोबरपासून मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या 5 भाषांमधून आपल्या भेटीला, असं खास कॅप्शन देत सुबोध भावे यांनी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग अंगावर रोमांच उभा करतो. स्वराज्यासाठी प्राणपणाला लावणारे शिवाजी महाराज आणि त्यांना विरोध करणाऱ्या बांदलाचं प्रतिनिधीत्व करणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील चकमकीबरोबर शाब्दिक जुगलबंदी ऐकून अंगावर शहारा आल्याशिवाय रहात नाही. ‘राजासाठी सैनिक मरतातच, पण एका सैनिकासाठी मरायला तयार झालेला राजा मी पहिल्यांदाच पाहिला’, असं जेव्हा बाजीप्रभू म्हणतात तेव्हा ते शब्द काळीज चिरत जातात. यानंतर घोडखिंडीत झालेली लढाई, बाजीप्रभू देशपांडेंच्या चातुर्यबुद्धीची झलक ट्रेलरमधून दिसते.

झी स्टुडियोजची आणि सुनील फडतरे यांच्या ‘श्री गणेश मार्केटिंग अँड फ्रेंड्स’ यांनी हर हर महादेव सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा येत्या दिवाळीत 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. अभिजित देशपांडे यांनी सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, हार्दिक जोशी प्रमुख भूमिका साकारत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धाडसाचं ज्वलंत उदाहरण! हिजाबविरोधात कपडे काढून नग्न झाली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल

नाद करा पण माझा कुठं! उर्फीच नवीन गाणं रिलीज; चाहते म्हणाले, ‘स्टार किड्स…’

हे देखील वाचा