मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम ‘राना दा’ आणि ‘पाठक बाई’ म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे लवकरच एकत्र नात्यात बांधले जाणार आहेत. अनेक दिवसांपासून चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहात होते मात्र, आज तो आनंदाचा दिवस उगवला आहे. (दि, 25 नोव्हेंबर) रोजी हे जोडपं विवाह बंधनात अडकणार आहेत.
‘तुझ्यात जिव रंगला’ (Tujhyat Jeev Rangala) या प्रसिद्ध मालिकेमुळे अक्षया देवधर (Akshaya Devdhar) आणि हार्दिक जोशी यांना घराघरात ओळख मिळाली. या जोडीला प्रेकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याशिवाय मालिकेला प्रेकांनी डोक्यावर घेतले होते. हार्दिकची भूमिका राणा असून त्याच्या भोळ्या स्वभावाने अनेकांना भुरळ घातली. राणा दा आणि पाठक बाई ही जोडी खूपच हिट ठरली. आजही त्यांना त्यांच्या भूमिकेतील नावानेच जास्त ओळखले जाते. प्रेश्रकांना आवडणारं जोडपं खऱ्या आयुष्यात एकत्र होणार आहे त्यामुळे चाहत्यांनाही खूपच आनंद होत आहे.
अक्षया आणि हार्दिक यांनी अनेक वर्ष एकत्र काम केले, दोघांची घट्ट मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी या नात्यला नाव देत विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला, आणि (दि, 3 मे 2022) रोजी त्यांचा साखरपुडा पार पडला. यानंतर सगळ्यांनाच त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. काही दवसांपूर्वी यांच्या केळवणाचे फोटो व्हायरल झाले होते आणि त्यानंतर नाशिक येवला ठिकाणी साड्यांची खरेदी केली. त्यामध्येच हार्दिक अक्षयाची साडी विनत असातानाचा व्हिडिओ देखिल व्हायरल झाला होता. तसेच त्यांच्या लग्न पत्रिकेवर चांदीचे पान लावण्यात येणार असल्याच्या चर्चा देखिल चांगल्याच रंगल्या होत्या. मात्र, लग्नाची तारिख गुपित ठेवण्यात आली होती.
View this post on Instagram
दोन दिवसांपूर्वीच अक्षयाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर मला नवरी झालेलं पाहायला तुम्ही सज्ज आहात का? अशी पोस्ट शेअर केली होती. हा लग्न सोहळा पुण्यामध्ये अत्यंत पारंपारिक पद्धतीने पार पडणार आहे. या सोहळ्यामध्ये मनोरंज क्षेत्रातील काही मोजकीच मंडळी हजेरी लावणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेते विक्रम गोखलेंबाबत मोठी बातमी! ‘लवकरच व्हेंटिलेटर काढणार, ते डोळेही उघडतायेत’, वाचा काय म्हटलेत डॉक्टर…
‘लोक आपल्या विषयी काय विचार करतात’, प्रदिप खरेराने पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना










