चित्रपटसृष्टीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. ‘हॅरी पॉटर’ आणि ‘जेम्स बाँड’ या प्रसिद्ध चित्रपटातील अभिनेता पॉल रिटर यांचे सोमवारी (५ एप्रिल) निधन झाले आहे. ते ५४ वर्षांचे होते. मागील काही काळापासून ते ब्रेन ट्यूमर या आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या कुटुंबासमोरच शेवटचा श्वास घेतला. पॉल यांच्या निधनाने हॉलिवूड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांसह कलाकारही दु:ख व्यक्त करत आहेत.
‘हॅरी पॉटर’ चित्रपटात विजर्ड एल्डरेड वोर्पले ही भूमिका साकारल्यामुळे पॉल यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. त्याचसोबत त्यांच्या अभिनयाची प्रशंसाही करण्यात आली. पॉल यांच्या प्रवक्त्याने एका चॅनेलशी बोलताना म्हटले की, ‘सांगताना खूप वाईट वाटत आहे की, सोमवारी रात्री पॉल रिटर यांचे निधन झाले आहे. त्यांचे निधन घरामध्येच झाले. त्यांच्या कुटुंबात आता त्यांची पत्नी पोली, मुले फ्रँक आणि नोआह आहेत.’ माध्यमांतील वृत्तानुसार, पॉल यांनी ब्रेन ट्यूमर असल्याचे कोणालाही सांगितले नव्हते,
Paul Ritter, who appeared as Guy Haines in Quantum of Solace, has very sadly passed away. Our thoughts are with his family and friends. pic.twitter.com/QOTbMRsrRE
— James Bond (@007) April 6, 2021
पुढे बोलताना त्यांच्या प्रवक्त्याने म्हटले की, ‘ते ५४ वर्षांचे होते आणि ब्रेन ट्यूमर या आजाराशी ग्रस्त होते. पॉल एक प्रतिभावान अभिनेते होते. ते खूप हुशार, उदार मनाचे आणि मजेशीर व्यक्ती होते. त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. ते सिनेमासोबतच थिएटरमध्येही काम करत होते. त्यांनी ऑन स्क्रीन आणि स्टेजवर अनेेक दमदार भूमिका साकारल्या होत्या. आम्हाला त्यांची खूप आठवण येईल.’
पॉल यांनी केवळ चित्रपटातच नव्हे, तर टीव्ही मालिकेतही काम केले होते. ते एक उत्तम स्टेज अभिनेतेही होते. कोरम बॉय प्लेसाठी त्यांनी सन २००६ मध्ये ऑलिव्हर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. याव्यतिरिक्त नोरमॅन कॉन्क्वेस्ट प्लेमध्येही त्यांच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले होते.
3/3 and once again his unique talent, presence and genius shone through. I just adored watching him work. My thoughts go to his family & friends. Thank you Paul for raising the bar and for being such an inspiring actor to our community. We will miss you so much. #PaulRitter ???? pic.twitter.com/oVb8Ho6gPj
— Daniel Mays ???? (@DanielMays9) April 6, 2021
सन २०१४ मध्ये टोबी व्हाईटहाऊस द्वारे एक स्पाय थ्रिलर चित्रपट लिहिला गेला होता, ज्याचे नाव ‘द गेम’ असे होते. या चित्रपटातही पॉल यांनी उत्तम अभिनय केला होता. सन २०१९ मध्ये पॉल यांनी ‘चेर्नोबिल’मध्ये अनातोली डायटालोव्हच्या रूपात एक जबरदस्त प्रदर्शन केले होते. रिटर यांना या चित्रपटासाठी अनेक पुरस्कारही मिळाले होते.
Thank you to everyone for sending mesages about Paul Ritter. Much appreciated. He was a man who touched so many hearts. My thoughts go out to his lovely family.
— Robert Popper (@robertpopper) April 6, 2021
पॉल यांनी ‘हाफ ब्लड प्रिंस’ आणि ‘क्वांटम ऑफ सोलेस’मध्येही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले. ‘फ्रायडे नाईट डिनर’चे निर्माते रॉबर्ट पॉपर यांनी पॉल रिटर यांच्या निधनावर श्रद्धांजली वाहिली आहे. रॉबर्ट यांनी म्हटले की, ‘या भयानक दु:खद बातमीने मी तुटलो आहे. पॉल एक खूपच चांगले आणि दमदार व्यक्तिमत्त्व होते.’
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-वादग्रस्त ट्वीट करणे अभिनेत्रीला पडले महागात; अंधेरी येथील न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश
-ट्रोलर्सला कंटाळून म्हणाला होता अभिषेक बच्चन, ‘अमिताभ यांचा मुलगा असल्यामुळे ऐश्वर्या नाही मिळाली’










