Friday, March 29, 2024

ट्रोलर्सला कंटाळून म्हणाला होता अभिषेक बच्चन, ‘अमिताभ यांचा मुलगा असल्यामुळे ऐश्वर्या नाही मिळाली’

बॉलिवूडमधील सगळ्यात प्रसिद्ध आणि रोमँटिक जोडप्यांपैकी एक म्हणजे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन. त्या दोघांची केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांना बघायला मिळते. त्यांची प्रेमकहाणी देखील खूप रंजक आहे. त्या दोघांची पहिली भेट 1997 मध्ये ‘और प्यार हो गया’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात ऐश्वर्या आणि बॉबी देओल काम करत होते, तेव्हा बॉबी आणि अभिषेक खूप चांगले मित्र होते. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकची ओळख झाली. त्यानंतर 20 एप्रिल, 2007 मध्ये त्या दोघांनी लग्न केले. परंतु अमिताभ बच्चनसारखे वडील आणि ऐश्वर्या सारखी यशस्वी बायको मिळाल्याने त्याला नेहमीच ट्रोल केले गेले. पण वेळोवेळी त्यांना उत्तर देऊन अभिषेकने त्यांची बोलती बंद केली आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेक आज खूप चांगले आयुष्य जगत आहे. पण त्या दोघांना लग्नानंतर देखील ट्रोल केले गेले. ‘ऐश्वर्यासारखी यशस्वी बायको अभिषेक बच्चनला शोभत नाही,’ असे अनेकांनी म्हटले, तर काहींनी म्हटले की, ‘अभिषेक हा अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे म्हणून ऐश्वर्याने त्याच्याशी लग्न केले.’

परंतु पाणी डोक्यावरून गेल्यानंतर मात्र अभिषेकने सगळ्यांना उत्तर दिले. एकदा अभिषेक करण जोहरच्या चॅट शोमध्ये आला होता. त्यावेळी त्याने सांगितले की, “ऐश्वर्याने माझ्याशी यासाठी लग्न नाही केले की, मी एक स्टार आहे किंवा अमिताभ बच्चन माझे वडील आहेत. मीदेखील यासाठी ऐश्वर्याशी लग्न नाही केले की, ती जगातील सगळ्यात सुंदर दिसणारी मुलगी आहे.”

यावर करणने त्याला प्रश्न विचारला की, “तुला कधी ऐश्वर्या बद्दल असुरक्षित नाही वाटले.” यावर अभिषेकने खूप छान उत्तर दिले तो म्हणाला की, “त्याच्या आणि ऐश्वर्यामध्ये असा प्रश्न कधीच उभा राहत नाही. आम्ही दोघेही आमच्या आयुष्याचा आनंद घेत असतो.” लग्नाच्या काही वर्षांनंतर त्या दोघांना आराध्या नावाची गोंडस मुलगी झाली.

लग्न झाल्यानंतर ऐश्वर्याचा बॉलिवूडमधील वावर कमी झाला. तिने ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यांनतर तिने अनेक हिट चित्रपट दिले. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘ताल’, ‘देवदास’, ‘ गुरु’, ‘जोधा अकबर’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये तिने काम केले आहे. तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या अभिनयाला देखील सगळ्यांनी भरभरून दाद दिली.

या जोडप्याला आराध्या नावाची एक गोंडस मुलगीही आहे. याव्यतिरिक्त अभिषेकच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो शेवटचा राजकुमार राव याच्या ‘लूडो’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख यांसारखे कलाकार होते. तो लवकरच त्याच्या ‘द बिग बुल’ आणि ‘बॉब विश्वास’ या चित्रपटात दिसणार आहे.(aishwarya rai and abhishek bachchan will celebrate their 14 th wedding anniversary)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग बॉसची ही स्पर्धक दुसर्यांदा अडकणार लग्न बंधनात; मोठ्या बिझनेसमन बरोबर थाटणार संसार

साउथच्या प्रसिद्ध अभिनेत्याला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक; वाचा सविस्तर

हे देखील वाचा