हॅरी पॉटर या चित्रपट सीरिजमधील हरमायनी तर तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच. कोणत्याही प्रश्नाचे पटापट उत्तर देणारी, आपल्या चाणाक्ष बुद्धीनी सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवणारी. हो अगदी बरोबर हरमायनी म्हणजे अभिनेत्री एमा वॉटसनबद्दल आपण बोलत आहोत. एमा वॉटसनने लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. परंतु तिच्या हॅरी पॉटरमुळे ती खूप चर्चेत आली. आणि या चित्रपटाने तिला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली होती. आज एमा सुंदर आणि हुशार अभिनेत्रींपैकी एक आहे. आज ती अनेक सुंदर अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते.ती 15 एप्रिलला तीचा 31 वा वाढदिवस साजरा करणार आहे, तर याच निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी.
एमा वॉटसन हीचा जन्म 15 एप्रिल 1990 मध्ये फ्रान्स येथे झाला. ती एक इंग्लिश अभिनेत्री आणि मॉडेल आहे. एमा ही तिच्या चित्रपटा बरोबरच तिच्या अनेक गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असते. ती प्रत्येक मुद्यावर तिचे मत बिनधास्तपणे मांडत आहेत.त्यामुळे तिला नेहमीच ट्रोल केले जाते.
एमा वॉटसन हीने केवळ चित्रपटात नव्हे तर अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. हॅरी पॉटर नंतर तिने अनेक चित्रपटात सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले आहे. ‘रेडरेसन’ , ‘द सर्कल’, ‘कोलोनाया’ या चित्रपटांसाठी तिला अकॅडमी पुरस्कार सोहळ्यात नामांकन देखील मिळाले होते. पण त्यानंतर 2011 पासून ते 2014 पर्यंत ती तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी चित्रपटसृष्टी पासून लांब गेली होती. एमाने इंग्लिश लिटरेचरमध्ये तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.
तिने 2019 मध्ये शेवटचे ‘लिटिल वूमन’ या चित्रपटात काम केले आहे. ग्रेट गेरविग’ यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात तिने मेग मार्च हे पात्र निभावले होते. या आधी ती एकदा तृतीय पंथीयांच्या अधिकारासाठी तिचे मत मांडल्याने सर्वत्र चर्चेत होती.