हर्षवर्धन कपूर हे बॉलिवूडच्या स्टारकिडपैकी असे एक नाव आहे, जो चित्रपटात काम करूनही त्याचे वडील अनिल कपूरप्रमाणे नाव कमवू शकला नाही. त्याने काही चित्रपटात काम केले; परंतु त्याचे ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनात काही खास जागा बनवू शकले नाही. सोशल मीडियावर तो त्याच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. अनेक विषयांवर तो त्याचे मत मांडताना नेहमीच दिसतो. अशातच गुरूवारी (9 नोव्हेंबर) हर्षवर्धन त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर यानिमित्त जाणून घेऊया त्याच्याबाबत काही खास गोष्टी…
हर्षवर्धनचा जन्म 9 नोव्हेंबर 1990 साली मुंबई येथे झाला. त्याच्या करिअरच्या सुरुवातीला तो एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्याने ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून भूमिका निभावली आहे. त्याच्या अभिनयातील करिअरची सुरुवात त्याने ‘मिर्जया’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटातील अभिनयाचे त्याचे सर्वत्र कौतुक झाले, परंतु बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही खास कमाल करू शकला नाही. राकेश ओम प्रकाश मेहरा यांचा हा चित्रपट होता. चित्रपटात सैयामी खेर ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत होती. (Harshvardhan Kapoor celebrating his 31 st birthday, know about his life)
हर्षवर्धन 2018 मध्ये भावेश जोशी यांच्या ‘सुपरहिरो’ या चित्रपटात देखील दिसला होता. परंतु त्याचा हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही. हर्षवर्धन चित्रपटाची स्क्रिप्ट निवडताना कुठे ना कुठे कमी पडला, त्यामुळेच त्याचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले होते. तो त्याच्या वडिलांसोबत अभिनव बिंद्राच्या बायोपिकमध्ये दिसण्याची शक्यता आहे. अनेकवेळा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे.
‘मिर्जया’ या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी त्याला एक प्रश्न विचारला होता की, त्याचे वडील अनिल कपूर यांचा लोकप्रिय डायलॉग ‘झक्कास’ हा कोणत्या चित्रपटातील आहे. सुरुवातीला तर त्याने खूप विचार केला आणि नंतर इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्या परंतु त्यांनी शेवटपर्यंत हे सांगितले नाही की, हा डायलॉग ‘युद्ध’ या चित्रपटातील आहे.
हर्षवर्धन त्याच्या वडिलांवर आणि बहिणींवर खूप प्रेम करतो. त्याच्या वडिलांसोबत त्याचे अगदी मैत्रीचे नाते आहे. त्याच्या करिअरबाबत तो खूप गंभीर असतो. आता तो कोणत्या हिट चित्रपटासोबत पुन्हा आगमन करणार आहे याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.
हेही वाचा-
–वादासोबत पायल रोहतगीचे आहे जुने नाते, ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकावर केला होता शारीरिक अत्याचाराचा आरोप
–हर्षवर्धन कपूर वडिलांबद्दल बोलला असं काही की, अनिल कपूर म्हणाले, ‘मी तुला इतके वर्ष वाढवलं आणि तू…’