Latest Posts

सपना चौधरीने लावले ऐश्वर्या राय बच्चनच्या गाण्यावर ठुमके; चाहते म्हणाले, ‘आता फक्त शाहरुख खानची…’


आपल्या डान्सने सर्वांना आकर्षित करणारी हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ म्हणजेच अभिनेत्री सपना चौधरी होय. सपनाने खूप मेहनतीने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. सुरुवातीला मर्यादित शहरांमध्ये डान्स परफॉर्मन्स करणारी सपना हळहळू भारतभर आपला जलवा दाखवू लागली. तिचा डान्स पाहण्यासाठी आजही प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करतात. आघाडीच्या अभिनेत्रींप्रमाणे आता सपनादेखील सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिला सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी संपर्क साधत असते. नुकतेच तिने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चनच्या गाण्यावर डान्स करत आहे. (Haryanvi Queen Sapna Choudhary Dance On Aishwarya Rai Song Video Goes To Viral)

नुकतेच सपनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओत दिसते की, सपना आपल्या सोसायटीच्या खाली ‘मोहब्बतें’ चित्रपटातील ऐश्वर्या राय बच्चनच्या ‘हमको हमी से चुरा लो’ या प्रसिद्ध गाण्यावर ऍक्शन करताना दिसत आहे. हवेत उडणारे तिचे केस आणि ओढणी चाहत्यांना दीवाना करत आहे. सपनाच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

सपनाने “ये हंसी वादियाँ, ये खुशनुमा समा, ये ठंडी हवा,ये झुका आसमा!,” अशा आशयाचे कॅप्शन आपल्या व्हिडिओला दिले आहे. तिच्या या पोस्टवर चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “आता फक्त शाहरुख खानची कमी आहे.” दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट केली की, “तुम्ही कमाल आहात.”

सपनाने आपल्या चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. कदाचित त्यामुळेच तिची पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करता क्षणीच व्हायरल होते.

सपनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर नुकतेच तिचे अनेक म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाले आहेत. यासोबतच अनेक म्युझिक व्हिडिओ अजून प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. सपनाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात हरियाणाच्या ऑर्केस्ट्रा पार्टीमधून केली होती. हळहळू ती हरियाणा आणि जवळपासच्या राज्यांमध्ये रागिनीच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ लागली. अशाप्रकारे तिच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली. विशेष म्हणजे सपना नंतर ‘बिग बॉस ११’चाही भाग बनली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-संजू बाबाची पत्नी वयाच्या ४२ व्या वर्षीही आहे एकदम फिट; वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ केला शेअर

-‘आई शानदार असते!’ मुलाला कुशीत घेऊन आईने एका हाताने घेतला भन्नाट कॅच; अनुष्का शर्माही झाली इम्प्रेस

-‘अभिनेत्याला जामीन अन् संताला जेल’, म्हणत पर्ल पुरीवर भडकले आसारामचे भक्त, सोशलवर मीडियाद्वारे राग व्यक्त


Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss