Sunday, August 3, 2025
Home मराठी एखाद्या अभिनेत्यापेक्षा कमी हँडसम नाहीये मृण्मयी देशपांडेचा पती; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ‘खरंच की!’

एखाद्या अभिनेत्यापेक्षा कमी हँडसम नाहीये मृण्मयी देशपांडेचा पती; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ‘खरंच की!’

साल २०१२ मध्ये झी मराठीवर ‘कुंकू’ ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेद्वारे घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजेच मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) होय. यातील ‘जानकी’ हे पात्र चांगलेच गाजले. केवळ मालिकाच नव्हे तर नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून मृण्मयीने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. याशिवाय काही दिवसांपूर्वीच तिने ओटीटीवर देखील दमदार एन्ट्री मारली आहे. सिनेसृष्टीत सक्रिय राहणारी अभिनेत्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असल्याचे दिसते. सतत फोटो पोस्ट करून, ती चाहत्यांना तिच्याबद्दल अपडेट देत असते. यावेळी ती अनेकदा तिच्या कुटुंबाचे फोटोही शेअर करत असते.

आज आपण तिच्या पतीबद्दल जाणून घेणार आहोत. अभिनेत्रीच्या पतीचे नाव स्वप्नील राव आहे. तो दिसायला देखील एखाद्या अभिनेत्या इतकाच हँडसम देखील आहे. मृण्मयी आणि स्वप्नील यांची जोडी सिनेसृष्टीतील परफेक्ट जोडी आहे. (have you ever seen mrinmayi deshpandes husband he looks handsome)

स्वप्नील आणि मृण्मयी यांचे अरेंज मॅरेज झाले आहे. अभिनेत्रीला बघायला गेल्यावर, तिचा पाहता क्षणीच स्वप्नील तिच्या प्रेमात पडला होता. महत्त्वाचे म्हणजे, या दोघांचे स्वभावही बरेच मिळतेजुळते आहेत.

तसेच, स्वप्नीलचा अभिनयाशी कसलाही संबंध नाही. तो एक बिझनेसमॅन आहे. या दोघांनी ३ डिसेंबर, २०१६ रोजी लग्नगाठ बांधली. आज दोघेही त्यांच्या सुखी संसाराचा आनंद घेत आहेत.

अभिनेत्रीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ‘इट्स ब्रेकिंग न्यूज’ या हिंदी चित्रपटाद्वारे मृण्मयीने अभिनयात पदार्पण केले होते. त्यानंतर ‘मोकळा श्वास’ मधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. अभिनेत्रीने ‘कट्यार काळजात घुसली’, ‘स्लॅमबुक’, ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘शिकारी’ यासह अनेक चित्रपटात काम केले आहे. ती ‘सा रे ग म लिटल चॅम्प्स’ हा गायन शोला होस्ट करतानाही दिसते.

हेही वाचा-

हे देखील वाचा