तापसी पन्नूचं ‘आयटम साँग’ पाहिलंय का? व्यंकटेशच्या चित्रपटात दिसली होती बोल्ड रूपात, पाहा व्हिडिओ

have you seen actress taapsee pannu item number dance south bhojpuri mogi


सन 2010 मध्ये ‘झुम्मंडी नादम’ या तेलुगु चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण करणारी अभिनेत्री तापसी पन्नू ही भारतीय सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तापसी ही तमिळ, तेलुगु तसेच हिंदी चित्रपटांमध्येही तिच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांना प्रभावित करत आहे. केवळ अभिनयातच नव्हे, तर सौंदर्याच्या बाबतीतही  ती कोणापेक्षा कमी नाही. साऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत तिच्या सौंदर्याबद्दलही चर्चा होत असते.

‘नाम शबाना’, ‘पिंक’, ‘द गाझी अटॅक’, ‘सूरमा’, ‘बदला’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या तापसीकडे आजच्या काळात बऱ्याच ऑफर येत राहतात. बॉलिवूडमध्ये, फीमेल सेंट्रिक चित्रपटांमध्ये आव्हानात्मक भूमिकेसाठी तापसीची निवड केली जाते. बहुतेक चित्रपटांत ती सिंगल लीड अभिनेत्री म्हणून काम करते.

पण तुम्हाला माहिती आहे का, की तुमच्या आवडत्या स्टारने तिच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत आयटम साँगवरही परफॉर्म केले होते. अनेक टॉलिवूड चित्रपटांच्या आयटम नंबरमध्ये तिने तिचे बोल्ड रूपही दाखवले आहे. या व्हिडिओमध्ये तापसी, व्यंकटेश अभिनित ‘शॅडो’ या चित्रपटाच्या ‘नॉटी नॉटी गर्ल’ या आयटम साँगवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटामध्ये तापसी मधुबालाच्या भूमिकेत ‘नॉटी नॉटी गर्ल’ गाण्यावर मस्त डान्स करत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेता व्यंकटेश तिच्यासमोर बसून तिचा परफॉर्मन्स पाहत आहे. तेलुगु आणि तमिळ प्रेक्षक तापसीच्या डान्सचे चाहते आहेत. पण ‘पिंक’ फेम अभिनेत्री आयटम नंबरवरही डान्स करते हे हिंदी चित्रपट प्रेमींना क्वचितच ठाऊक असेल.

तापसीच्या सध्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिच्याकडे ‘लूप लपेटा’, ‘शाबाश मिठू’, ‘रश्मी रॉकेट’, ‘हसीन दिलरूबा’, ‘वो लडकी है कहा’, ‘दोबारा’ यांसारखे अनेक चित्रपट आहेत. हे सर्व चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉटनेस ओव्हरलोड! तेलुगु अभिनेत्रीचे स्विमिंग पूलवरील बिकिनीतील फोटोशूट होतंय व्हायरल, पाहा बोल्ड फोटो

-नादच खुळा! ‘तेरी मिट्टी’ गाण्याला आवाज देणाऱ्या बी प्राकचं नवीन गाणं रिलीझ, होतंय जोरदार व्हायरल

-बजरंगी भाईजाच्या मुन्नीने पुन्हा वेधले चाहत्यांचे लक्ष, डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल!!


Leave A Reply

Your email address will not be published.