Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड ‘हम दिले दे चुके सनम’पासून ते ‘पद्मावत’पर्यंत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले भन्साळींचे सिनेमे; तरीही बॉक्स ऑफिसवर ठरले सुपरहिट

‘हम दिले दे चुके सनम’पासून ते ‘पद्मावत’पर्यंत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले भन्साळींचे सिनेमे; तरीही बॉक्स ऑफिसवर ठरले सुपरहिट

बॉलिवूड चित्रपटसृष्टीला आतापर्यंत अनेक दिग्गज दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार लाभले आहेत. या सर्वांनी आपल्या कामाने नेहमीच चाहत्यांची मने जिंकली आहेत. अशामध्ये काहीवेळा त्यांना आपल्या चित्रपटांमुळे वादाचा सामनाही करावा लागला आहे. चित्रपटसृष्टीत जर वादग्रस्त निर्माता- दिग्दर्शकाबद्दल बोलायचं झालं, तर संजय लीला भन्साळी यांचे नाव सर्वप्रथम येते. आज ते आपला 59 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी, 1963 रोजी मुंबईत झाला होता. त्यांनी आपल्या कारकीर्दीत एकापेक्षा एक उत्तम अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यातील अनेक सिनेमे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

कारकीर्दीच्या सुरुवातीला संजय लीला भन्साळी यांनी विधू विनोद चोप्रा यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केले. दोघांनी मिळून ‘परिंदा’, ‘1942: अ लव्ह स्टोरी’ आणि ‘करीब’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. परंतु अचानक काही कारणामुळे त्यांच्यात भांडण झाले.

sanjay leela bhansali
Photo Courtesy Social Media

विधू यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर संजय यांनी आपल्या ‘खामोशी’ या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. यानंतर त्यांनी पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही. संजय लीला भन्साळी यांनी ‘हम दिल चुके सनम’ हा चित्रपट बनवला, जो आतापर्यंत सर्वाधिक ब्लॉकबस्टर ठरला होता. यानंतर त्यांनी अनेक लव्हस्टोरीवर आधारित चित्रपट बनवले. यासोबतच चित्रपटसृष्टीत जर वादग्रस्त निर्माता- दिग्दर्शकाबद्दल बोलायचं झालं, तर संजय लीला भन्साळी यांचे नाव सर्वप्रथम येते.

संजय कधी आपल्या चित्रपटाच्या कहाणीमुळे, तर कधी आपल्या चित्रपटातील कलाकारांमुळे चर्चेचा विषय ठरतात. आज या लेखात आपण संजय लीला भन्साळी यांच्या त्या चित्रपटांविषयी माहिती घेणार आहोत, ज्यांच्याबद्दल तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

हम दिल दे चुके सनम
सन 1999 मध्ये आलेला ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांमध्ये सामील आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या भूमिकेने चाहत्यांची मने जिंकली होती. यामध्ये अजय देवगणचाही समावेश होता. सलमान आणि ऐश्वर्यामधील अफेयरच्या चर्चांमुळे हा चित्रपट भलताच यशस्वी झाला होता. सलमानमुळे ऐश्वर्याला ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट मिळाला होता. चित्रपटाच्या शूटिंगसोबतच दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्या दोघांमधील भांडणाच्या बातम्याही चर्चेत होत्या.

देवदास
संजय लीला भन्साळी आपल्या उत्तम चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यापैकीच एक म्हणजे ‘देवदास’. सन २००२ मध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानसोबत मिळून त्यांनी ‘देवदास’ चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात शाहरुखच्या अभिनयाने चाहते फिदा झाले होते. हा चित्रपटही चांगलाच चर्चेत राहिला होता. शाहरुख खान, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय बच्चन यांचा समावेश असलेल्या या चित्रपटाने ५ राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केले होते. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ५० कोटी रुपयांचा खर्च झाला होता. चंद्रमुखीचा कोठा बनवण्यासाठी तब्बल १२ कोटी रुपयांचा खर्च आला होता. दुसरीकडे चित्रपटाचा सेट बनवण्यासाठी एकूण २० कोटी रुपयांचा खर्च आला होता. सोबतच ज्या घरात ऐश्वर्याच्या सीनचे शूटिंग झाले होते, ते १.२२ लाख काचेच्या तुकड्यांना जोडून बनवण्यात आले होते. पावसाच्या सीननंतर हे पुन्हा रंगवावे लागत होते.

सांवरिया
सन २००७ मध्ये संजय दिग्दर्शित ‘सांवरिया’ चित्रपटामधून अभिनेत्री सोनम कपूर आणि रणबीर कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. रणबीरने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी त्याला फीस मिळाली नव्हती. सोनम आणि रणबीरच्या या चित्रपटासाठी संजय यांनी फिल्म सिटीमध्ये खूप मोठा सेट लावला होता. यामध्येच सलमान खान आणि राणी मुखर्जी यांनाही घेतले होते. परंतु तरीही, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

गोलियों की रासलीला रामलीला
‘गोलिंयो की रासलीला रामलीला’ चित्रपट आपल्या नावामुळेही चांगलाच वादात अडकला होता. सन २०१२ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटाच्या सेटवर ‘अंग लगा दे’ गाण्याचे शूटिंग होणार होते. दोन्ही गाण्यानंतर शेवटी एक किसिंग सीनचे शूटिंग व्हायचे होते. याच्या शूटिंगदरम्यान दोन्ही दिग्दर्शकांनी कट म्हटल्यानंतरही ते रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण एकमेकांना किस करत होते. त्यावेळी सेटवर ५० व्यक्ती उपस्थित होते आणि हे सर्व पाहून तेही चकित झाले होते. या किसनंतर हे सर्वांना समजले होते की, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत.

पद्मावत
सन २०१८ मध्ये आलेला ‘पद्मावत’ चित्रपट वादात अडकला होता. करणी सेनेच्या विरोधामुळे हा चित्रपट भलताच चर्चेत आला होता. वादात राहिलेल्या संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. सन २०१८ मधील सर्वात वादग्रस्त चित्रपटांमध्ये ‘पद्मावत’ या चित्रपटाचे नाव सर्वप्रथम येते. चित्रपट रिलीझ करण्यासाठी संजय यांनी करणी सेनासोबत मोठा संघर्ष करावा लागला होता. सन २०१७ पासूनच या चित्रपटाला विरोध दर्शवण्यास सुरुवात झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“दगडाची किंमत वाढवत आहे” घटस्फोटानंतर आयुष्यात पुढे जाणाऱ्या ‘या’ मराठी अभिनेत्री पोस्ट झाली व्हायरल

दमदार अंदाजमध्ये तलवारबाजी करताना दिसली सुश्मिता सेन, व्हिडिओ शेअर करत लिहिले…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा