Wednesday, August 13, 2025
Home कॅलेंडर मॉडेलिंग ते बॉलिवूड, अनेक पुरस्कारांवर मोहोर अन् कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात; वाचा सोनाली बेंद्रेचा अभिनयप्रवास

मॉडेलिंग ते बॉलिवूड, अनेक पुरस्कारांवर मोहोर अन् कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात; वाचा सोनाली बेंद्रेचा अभिनयप्रवास

हिंदी सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रे हीचा १ जानेवारी हा जन्मदिवस असतो. सोनालीसाठीही १ जानेवारी ही तारीख नेहमीच खास असते. एकतर नवीन वर्षाची सुरुवात आणि दुसरा वाढदिवस.

दिनांक १ जानेवारी १९७५ साली सोनालीचा मुंबईमध्ये जन्म झाला. सोनालीने तिच्या करियरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. सलमान, आमिर, शाहरुख सोबतच सैफ अली खान या चारही खानसोबत तिने काम केले.

सोनालीचा जन्म एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन परिवारात झाला. ती कॉलेजमध्ये असल्यापासूनच मॉडेलिंग करत होती. मॉडेलिंग करतानाच तिला ‘आग’ चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली. तिने या सिनेमाला होकार दिला १९९४ साली आलेला हा सिनेमा हिट ठरला. आगमध्ये तिच्यासोबत गोविंदा आणि शिल्पा शेट्टी देखील होते. या सिनेमासाठी तिला फ्रेश नवीन चेहरा हा फिल्मफेयरचा पुरस्कार देखील मिळाला.

Sonali Bendre New
Sonali Bendre New

फिल्मी करियरमध्ये सोनालीला खूप कठीण वेळेला तोंड दयावे लागले. सोनालीचा १९९६ साली अजय देवगण सोबत ‘दिलजले’ सिनेमा आलं आणि हा चित्रपट सुपरहिट झाला. त्यानंतर तिला अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या.

सोनालीने सुनील शेट्टीसोबत ‘भाई’, आमिर खान सोबत ‘सरफ़रोश’, शाहरुख़ खान सोबत ‘डुप्लीकेट’, सलमान खान, सैफ आली खान सोबत ‘हम साथ साथ है’, ‘तेरा मेरा साथ रहे’ ‘अनाहत’ आदी चित्रपटात काम केले. शिवाय सोनालीने तिच्या डान्सने देखील लोकांचे मन जिंकले. सोनालीचे ‘हम्मा-हम्मा’ गाणे विशेष गाजले.

Sonali Bendre Familly
Sonali Bendre Familly

सोनालीने १२ नोव्हेंबर २००२ ला गोल्डी बहल सोबत लग्न केले त्यांना रणवीर बहल नावाचा मुलगा आहे.
सोनालीचे सर्व जीवन सुरळीत सुरु असतांना २०१८ साली सोनालीला कॅन्सर झाल्याचे लक्षात आले. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने ही माहिती सर्वाना दिली. तिने कॅन्सरवर न्यूयॉर्कमध्ये जाऊन उपचार घेतले.

Sonali Bendre
Sonali Bendre

तिच्या या कठीण प्रसंगात तिचा नवरा गोल्डी बहल सतत तिच्यासोबत होता. सोनाली या काळात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय होती. तिच्या सर्व अपडेट ती देत होती. अनेक महिन्यांच्या उपचारानंतर अखेर सोनाली कॅन्सर मुक्त झाली. सोनालीने कॅन्सरसोबत केलेल्या यशस्वी लढाईमुळे आज ती अनेकांचा प्रेरणास्रोत बनली आहे.
सोनालीला दैनिक बोंबाबोंबकडूनही वाढदिवसाच्या आणि पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा.

हे देखील वाचा