सध्या सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म आहे. जिथे कलाकार त्यांच्या कला दाखवता असतात. सोशल मीडियावर अगदी सामान्य माणसापासून ते कलाकार देखील त्यांच्यातील टॅलेंट सादर करत असतात. अशातच बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील दोन स्पर्धकांनी त्यांचा एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. हिना पांचाळ आणि माधव देवचक्के यांनी एक परफॉर्मन्स सादर केला आहे. जो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
हिना पांचाळने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, तिने जांभळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. तसेच पायात हाय हिल्स घातले आहेत आणि केस मोकळे सोडले आहे. तसेच दुसरीकडे माधवने शर्ट आणि जीन्स परिधान केली आहे. ते दोघेही एका बाकावर बसलेली आहेत. ते दोघेही ‘तुम इतने अच्छे हो किस लिये’ या गाण्यावर परफॉर्मन्स देताना दिसत आहेत. त्यांचा आणखी एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. ज्यात ते दोघेही पुष्पा चित्रपटातील ‘उ अंटावा’ गाण्यावर डान्स करत आहे.
https://www.instagram.com/reel/CalyC5eK-Tf/?utm_source=ig_web_copy_link
त्यांचा हा व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडत आहे. अनेकजण त्यांचा या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. हिना आणि माधव हे बिग बॉसमधील लोकप्रिय स्पर्धक होते. हिना ही शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आली होती. तिचा गेम देखील सगळ्यांना खूप आवडला होता. मध्यंतरी ती वादाच्या भोवऱ्यात अडकला होती. तिला ड्रॅग प्रकरणात अटक करण्यात आले होते. त्यांचा हा व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडत आहे. अनेकजण त्यांचा या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. हिना आणि माधव हे बिग बॉसमधील लोकप्रिय स्पर्धक होते. हिना ही शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आली होती. तिचा गेम देखील सगळ्यांना खूप आवडला होता. मध्यंतरी ती वादाच्या भोवऱ्यात अडकला होती. तिला ड्रॅग प्रकरणात अटक करण्यात आले होते.
हेही वाचा :