मराठी मनोरंजनविश्वातील सही अभिनेता म्हणून ओळखला जाणारा भरत जाधव नेहमीच त्याच्या कामामुळे किंवा त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतो. भरत जाधव हा हा मराठीमध्ये जेवढा त्याच्या चित्रपटांमुळे ओळखला जातो तेवढाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तो त्याच्या नाटकांमुळे ओळखला जातो. भरत आणि नाटक या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हटल्या तरी वावगे वाटणार नाही. त्याने केलेले नाटकं आजही लोकांच्या आठवणीत आहेत.
मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा मनिरंजनचं तिन्ही माध्यमांमध्ये काम केलेल्या भरतला तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. त्याच्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या. भरत जिकता उत्तम अभिनेता आहे, तितकाच उत्तम तो एक व्यक्ती आहे. नेहमीच त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून त्याच्यामधील एका उत्तम वक्तीचे दर्शन सर्वांना घडत असते. आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून अनेकदा तो त्याला आलेलं वेगवेगळे अनुभव त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. असाच एक मस्त अनुभव भरतने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
भरत जाधवने ( Bharat Jadhav) नुकताच इंस्टाग्रामवर एक स्क्रीन शॉट शेअर केला ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. या स्क्रीन शॉटमध्ये भरत जाधव दिसत असून खाली लिहिले आहे की, ‘मोरूची मावशी म्हणजे हशा, टाळ्या आणि शिट्ट्या…!’ या ओळीवर भरतचे नाव दिसत असून, त्यासमोर चार ब्लु टिक दिसत आहे.” हा फोटो शेअर करत त्याने लिहिले, “एकाच वेळी चार भरत जाधव रंगमंचावर दिसतात हे माहीत होतं. पण भरत जाधव च्या पोस्ट वर चार-चार ब्लू टिक दिसतात हे पहिल्यांदाच पाहिलं..!” त्यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी देखील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू केला आहे. या पोस्टला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स आल्या असून, सर्वच लोकं यावर आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहे.
भरत जाधवने त्याच्या करिअरची सुरुवात स्वर्गीय शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमापासून केली. त्यानंतर त्याने नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्याची ‘ऑल द बेस्ट’ ही एकांकिका तुफान गाजली. यावर आधारित असलेल्या ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाला लोकांनी तर अक्षरशः उचलून घेतले. त्यानंतर तो ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘अधांतर’, ‘सही रे सही’, ‘मोरूची मावशी’ आदी नाटकांमध्ये तर गलगले निघाले, साडे माडे तीन, पछाडलेला, खो खो आदी अनेक चित्रपटांमध्ये दिसला. काही महिन्यनपूर्वीच त्याची प्रसिद्ध आणि गाजलेली ‘सुखी माणसाचा सदरा’ ही मालिका संपली. त्याची आणि केदार शिंदेची जोडी तुफान गाजते आणि यश मिळते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इंडिका गाडीतून भरत जाधव गेला होता ‘सही रे सही’च्या पहिल्या शोला, मनोरंजक होता ‘त्या’ शोचा किस्सा
सिद्धांतच्या मृत्यूने विवेक अग्निहोत्रीला बसला धक्का, ट्विट करत म्हणाले…