Saturday, June 29, 2024

गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर, रिचा चढ्ढाने शेअर केला सुंदर व्हिडिओ, बेबी बंप केला फ्लॉन्ट

सध्या रिचा चढ्ढा (Richa chadda) तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर चर्चेत आहे. रिचा आणि अली फजल त्यांच्या पहिल्या अपत्याची अपेक्षा करत आहेत. अलीकडेच, दोन्ही स्टार्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली होती की ते लवकरच पालक होणार आहेत. अशातच रिचाने आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच व्हायरल होत आहे.

रिचा चड्ढाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्री सोफ्यावर आराम करताना तिच्या बेबी बंपची झलक देते. व्हिडिओमध्ये रिचा पोटाशी खेळताना दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘क्यूट, पिंक वेनेड कान, कॉटन स्कार्फ आणि म्याव, मामाचे चिपकू.’

या जोडप्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. रिचा आणि अलीने ९ फेब्रुवारीला सोशल मीडियावर एका फोटोद्वारे ही माहिती दिली. 1+1=3 लिहिलेल्या फोटोसोबत अलीने इंस्टाग्रामवर कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘लहान हृदयाचा ठोका हा आपल्या जगातील सर्वात मोठा आवाज आहे.’

रिचा चड्ढाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री अलीकडेच तिच्या कॉमेडी ड्रामा फिल्म ‘फुक्रे 3’ मध्ये दिसली. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर ऋचा संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या मालिकेत दिसणार आहे.

ही मालिका यावर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. रिचा व्यतिरिक्त मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांसारख्या कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

रकुल प्रीत सिंग-जॅकी भगनानी लग्नासाठी गोव्याला रवाना, कुटुंबासह विमानतळावर झाले स्पॉट
आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसने सुहानी भटनागरच्या निधनावर केला शोक व्यक्त, सोशल मीडियावर केली पोस्ट

 

हे देखील वाचा