Tuesday, July 9, 2024

…जेव्हा हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी चक्क ‘बेडशीट’ गुंडाळून काढला होता फोटो, पाहाच

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक जोड्या आहेत ज्या चित्रपटात आणि खऱ्या आयुष्यात दोन्हीकडेही सुपरहिट ठरल्या आहेत. यामधील सर्वात गाजलेली जोडी म्हणजे अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) आणि हेमा मालिनी (Hema Malini). दोघांच्या प्रेम प्रकरणाची, चित्रपटांची चर्चा आजही सर्वत्र सुरू होत असते. त्यांच्या बाबतीत असाच एक किस्सा समोर आला आहे.

९०च्या दशकातील सर्वात गाजलेली जोडी म्हणून हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. दोघांचे असंख्य चाहते आहेत. आपल्या चित्रपटांइतकेच ते त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दलही नेहमी चर्चेत असतात. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्या काळात त्यांच्या एका फोटोची जोरदार चर्चा झाली होती. यामध्ये दोघांनीही चक्क बेडशीट गुंडाळून फोटो काढला होता. हा फोटो पाहून त्यांचे चाहते ही थक्क झाले होते.

एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांनी हा फोटो काढला होता. यामध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी बेडशीट गुंडाळली होती,सोबतच हातात बुके घेतला होता. हा फोटो त्या काळात चांगलाच चर्चेत आला होता. फोटोमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते.

चित्रपट जगतातील लोकप्रिय कलाकार असलेल्या हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी १९८०मध्ये लग्न केले. हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्यापेक्षा वयाने तब्बल १५ वर्षे लहान आहेत. मात्र दोघांच्या अभिनयाने त्या काळात जोरदार धुमाकूळ घातला होता. त्यांनी तब्बल २८ चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांच्या अभिनयाच्या जादूने हे सगळे चित्रपट सुपरहिट ठरले होते. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले यामुळेच धर्मेद्र आणि हेमा मालिनी यांचे चित्रपट यशस्वी ठरले.

धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी म्हणजे, ते लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी और रॉनी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, जया बच्चन आणि शबाना आझमी असे अनेक दिग्गज कलाकार काम करणार आहेत. सोबतच धर्मेंद्र त्यांच्या ‘अपने २’ या चित्रपटातही काम करणार आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा