Friday, December 8, 2023

‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी यांना बिग बींच्या मुलाला बनवायचे होते जावई, पण ईशाने ‘या’ कारणामुळे दिला नकार

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ राज्य केले आहे. हेमा यांना त्यांच्या सौंदर्यामुळे ‘ड्रीम गर्ल’ म्हटले जात असे. हेमा यांनी दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्याशी लग्न केले. हेमा यांना दोन मुली आहेत. जेव्हा हेमा यांची मुलगी लग्नासाठी योग्य वयात आली, तेव्हा त्यांना मुलगी ईशा देओलने (Esha Deol) त्यांच्या आवडत्या मुलाबरोबर लग्न करावे असे वाटत होते.

हेमा यांना अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मुलगा अभिषेक बच्चनला (Abhishek Bachchan) आपला जावई बनवायचा होता. हेमा आणि अमिताभ यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्या त्यांची चांगली मैत्रीणही आहेत. हेमा यांना त्यांच्या मैत्रीचे नात्यात रूपांतर करायचे होते. त्या अमिताभ यांच्या कुटुंबासोबतच त्यांचा मुलगा अभिषेकलाही चांगल्याच ओळखत होत्या. अभिषेक बच्चन सुसंस्कृत आणि आदरणीय होता, त्यामुळेच हेमा यांना त्याने आपल्या कुटुंबाचा एक भाग व्हावे असे वाटत होते. (hema malini daughter marriage amitabh bachchan son abhishek bachchan)

हेमा यांची मुलगी ईशा देओल हिला हे पटले नाही आणि तिने अभिषेकसोबत लग्न करण्यास नकार दिला. ईशा अभिषेकला भाऊ म्हणून पाहते, अशा बातम्या येत होत्या. याच कारणामुळे तिने लग्नाला नकार दिला होता. यानंतर ईशा देओलने तिच्या बालपणीच्या मित्राशी लग्न केले. ईशा देओलचा नवरा एक बिझनेस मॅन आहे. त्याचवेळी अभिषेक बच्चनने मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायसोबत (Aishwarya Rai) लग्न केले.

हेमा मालिनी त्यांच्या आयुष्यातील अनेक रंजक किस्से चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. एकदा त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते की, त्यांना फिल्मी दुनियेत हिरोईन बनवण्याचा निर्णय त्यांची आई जया यांनी घेतला होता. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांच्या स्क्रिप्ट ऐकण्यापासून ते पैसे पाहण्यापर्यंतचा सगळा हिशेब त्यांची आई सांभाळत असे. इतकंच नाही, तर हेमा यांची आई देखील त्यांच्यासोबत प्रत्येक शूटवर हजर असायची. हेमा यांनी स्वत: खुलासा केला होता की, लग्नापूर्वी त्या शूटिंगच्या सेटवर कधीही एकट्या गेल्या नाहीत.


हेही वाचा-
जरा इकडे पाहा! चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री उतरली ‘या’ व्यवसायात, जाणून घेतलंच पाहिजे
करिश्मा कपूरने साडीमध्ये केला कहर, वयाच्या 48 व्या वर्षीही दिसतेय हॉट!

हे देखील वाचा