Wednesday, July 3, 2024

लग्नाच्या 42 वर्षांनंतरही धर्मेंद्रच्या पहिल्या पत्नीला भेटल्या नाहीत हेमा मालिनी, ‘हे’ आहे कारण!

इंडस्ट्रीतील दिग्गज स्टार्समध्ये धर्मेंद्र (Dharmendra) आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या नावाचा समावेश होतो. या दोघांशी संबंधित अनेक किस्से आजही ऐकल्या आणि सांगितल्या जातात. आज आम्ही तुम्हाला हेमा आणि धर्मेंद्र यांच्याशी संबंधित असाच एक किस्सा सांगणार आहोत, जो अभिनेत्याची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्याशीही संबंधित आहे. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न १९५४ मध्ये प्रकाश कौर यांच्यासोबत कुटुंबीयांच्या संमतीने झाले होते. या लग्नातून सनी देओल (Sunny Deol), बॉबी देओल (Bobby Deol), विजेता देओल आणि अजिता देओल अशी चार मुले झाली. 

त्याच वेळी, १९८० मध्ये धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनीसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्याशी घटस्फोट न घेता हेमासोबत दुसरे लग्न केले होते. या घटनेने प्रकाश यांना खूप दुख झाले. त्याचवेळी, लग्नाला चार दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही हेमा अभिनेत्याची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना भेटलेल्या नाहीत. (hema malini did not meet dharmendra first wife prakash kaur)

याचे कारण हेमाने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते. हेमाच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यामुळे कोणाला कसलीही अडचण येऊ नये, असे त्यांना वाटत होते. त्यामुळेच त्यांनी प्रकाशपासून दूर राहणे चांगले मानले.

त्याचवेळी धर्मेंद्रच्या दुसऱ्या लग्नावर आपली प्रतिक्रिया देताना प्रकाश कौर यांनी ‘धर्मेंद्र चांगला पती होऊ शकले नाहीत, पण ते नक्कीच खूप चांगला पिता आहेत’ असं म्हटलं होतं. हेमासोबत लग्न केल्यानंतर धरम पाजी यांच्या घरी ईशा देओल (Isha Deol) आणि अहाना देओल या दोन मुलींचा जन्म झाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा