Wednesday, June 26, 2024

घटस्फोटानंतर ईशा देओलची राजकारणात एन्ट्री? आई हेमा मालिणी यांच्या वक्तव्याने खळबळ

गेल्या काही दिवसांपासून अभिनेते धर्मेंद्र (dharmendra) आणि अभिनेत्री हेमा मालिनी (hema malini) यांची लेक ईशा देओल (Isha deol) घटस्फोटामुळे चर्चेत आहे. नुकतचं खुद्द ईशा आणि भरत तख्तानी या दोघांनी स्टेटमेंट जारी करत घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली. सर्वत्र नतिच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असतानाच तिच्या राजकारणाच्या एन्ट्रीची चर्चा सुरु झाली आहे. हेम मालिनी सध्या आयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेमा मालिनी यांनी नुकतचं राम मंदिरात जाऊन रामललाचं दर्शन घेतलं. राम मंदिराला भेट दिल्यानंतर हेमा मालिनी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीने राजकारणात भाग घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली. दरम्यान, त्यांना ईशा देओलच्या राजकीय एन्ट्रीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना हेमा मालिनी म्हणाल्या, राजकारणात येण्यासाठी ईशा खुप इच्छुक आहे. तिला या सर्व गोष्टी आवडतात. पुढच्या काही वर्षात तिला इच्छा झाली तर ती नक्कीच राजकारणात एन्ट्री करेल. हेमा मालिनी यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळासह सिनेसृष्टीत ईशाच्या राजकीय प्रवेशाबद्दल चर्चेला उधाण आलं आहे.

ईशा आणि भरतने २०१२ साली विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर त्यांच्यात दुरावा आला होता. त्यांच्यात अनेक मतभेदही होती. त्यामुळे सुखी संसाराच्या ११ वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर, रिचा चढ्ढाने शेअर केला सुंदर व्हिडिओ, बेबी बंप केला फ्लॉन्ट
सुहानी भटनागर यांच्या निधनावर फोगट बहिणींनी केला शोक व्यक्त, गीता आणि बबिता यांनी केली भावनिक पोस्ट

हे देखील वाचा