मराठी चित्रपट जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या बिंनधास्त आणि स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. या अभिनेत्रींच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टची नेहमीच चर्चा पाहायला मिळत असते. यामध्ये सगळ्यात आधी नाव घेतले जाते ते म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवीचे (Hemangi Kavi). कोणताही मुद्दा असो किंवा कसलाही वाद असो त्याबद्दल आपले मत मांडायला ही अभिनेत्री कधीच घाबरत नाही. यामुळे अनेकदा तिला नेटकऱ्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले आहे. हेमांगी कवीच्या अभिनय कारकिर्दीबद्दल तर प्रत्येकाला माहित आहेच. आज तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
हेमांगी कवी ही मराठी चित्रपट जगतातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार आणि सहजसुंदर अभिनयाने तिने चाहत्यांची नेहमीच मने जिंकली आहेत. हेमांगी जितकी तिच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे तितकीच तिच्या सोशल मीडिया पोस्टचीही नेहमीच चर्चा होत असते. प्रत्येक ज्वलंत मुद्यावर ती आपले मत मांडत असते. हेमांगी कवी सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. यामध्ये तिने आपल्या पतीसोबत अनेक फोटो पोस्ट केले आहेत. मात्र खूप कमी लोकांना हेमांगीच्या पतीबद्दल माहिती आहे.
हेमांगी कवीच्या पतीचे नाव संदीप धुमाळ असून तो एक प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आहे. या सुंदर जोडप्याचा प्रेमविवाह झाला आहे.दोघांची प्रेमकथा ही एखाद्या चित्रपट कथेला लाजवेल अशीच आहे. हेमांगी कवी आणि संदीपची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले, मात्र त्यांच्या प्रेमाचा प्रवास मैत्रीपासून सुरू झाला. याच मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊन त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांच्या लग्नाला १३-१४ वर्ष झाली असून दोघेही सुखी संसारात व्यस्त आहेत.
दरम्यान अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपुर्वी तिची बाई बूब्स आणि ब्रा पोस्ट प्रचंड चर्चेत आली होती. एका व्हिडिओवर केलेल्या अश्लिल कंमेटवर उत्तर देताना तिने ही पोस्ट केली होती. यामध्ये अनेकांनी तिच्या या पोस्टमधील स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले होते तर काही जणांनी तिच्यावर टीकाही केली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
- Kangana चे किस्से | एकीकडे ‘पंगा गर्ल’ दुसरीकडे शिवसेनेचे ‘फायर ब्रँड नेते’, दोघांचं वाक् युद्ध देशभर गाजलं होतं
- वयाच्या ६२व्या वर्षी हेवी वेट लिफ्टिंग करताना दिसला संजय दत्त, अभिनेत्याने दाखवले बायसेप्स
- बर्थडे गर्ल Kangana चे किस्से | आजही कंगना आणि जावेद अख्तर यांच्यात सुरूये कोर्टात केस, जाणून घ्या प्रकरण