हेमांगी कवी ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. आपली मते परखडपणे मांडणारी हे एक उत्तम अभिनेत्री आहे तसेच अति उत्तम माणूस देखील आहे. सोशल मीडियावर अनेकदा तिच्याबरोबर घडलेल्या घटना गोष्टी यांच्यावर भाष्य करून त्यातून काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न तिने नेहमीच केलेला आहे. सोशल मीडियाचा वापर अनेकदा वायफळ गोष्टींसाठी केला जातो. परंतु समाजात घडणाऱ्या घटना दैनंदिन जीवनात स्त्रीला येणारे अनुभव यावर परखडपणे भाष्य करून ती सोशल मीडियावर ती शेअर करत असते.
हेमांगी कवी ही नेहमीच इंस्टाग्रामवर सक्रिय असताना आपल्याला दिसते. तिच्या व्यस्त जीवनातून वेळ काढून ती एखाद्या गोष्टीवर परखडपणे भाष्य करायचं असेल संदेश द्यायचा असेल, तरी ठामपणे मांडणे हेमांगी कवी नेहमीच करत असते. विनोदी अभिनेत्री म्हणून हेमांगी कवीची ओळख आहे. ‘फु बाई फु’, ‘कॉमेडीची बुलेटट्रेन’ यासारख्या विनोदी मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आली आणि तिच्या अभिनय कौशल्याने तिने अनेक चाहत्यांची मने जिंकली. (hemangi kavi share her dance video on social media)
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती ‘मेरा यार ‘ या हिंदी गाण्यावर हेमांगी कवी डान्स करतानाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. तिच्या चाहत्यांना हा व्हिडिओ फार आवडला आहे. या व्हिडिओला ९ हजारापेक्षाही जास्त लाईक्स आलेल्या दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
‘डावपेच’, ‘पिपाणी’, ‘गोळाबेरीज’ यांसारख्या सिनेमात काम करून ती प्रेक्षकांसमोर आली. मिळालेल्या संधीचं सोनं करत तिने चाहत्यांना भुरळ घातली. अनेक व्यावसायिक नाटक चिनी रंगभूमीवर केले. ‘बंदिशाळा’, ‘भूतकाळ’, ‘मनातल्या मनात’, ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’, ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’, असे सिनेमे देखील तिने केले आहेत. ‘फु बाई फु’ कॉमेडीची बुलेट ट्रेन यासारख्या विनोदी मालिकांमधून तिने आपल्या विनोदाचा वेगळा ठसा उमटवलेला आहे. एक उत्तम विनोदी अभिनेत्री, संवेदनशील व्यक्ती, परखडमते मांडणारी अभिनेत्री या सगळ्यासाठी हेमांगी कवीकडे बघितले जात.
हेही वाचा :