Thursday, March 28, 2024

दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा झाला, अनुष्का, विराटच्या मुलीचा वामिकाचा पहिला वाढदिवस

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांच्या मुलीचा वामिकाचा नुकताच पहिला वाढदिवस साजरा झाला. वामिकाचा हा पहिला वाढदिवस दक्षिण आफ्रिकेमध्ये साजरा करण्यात आला. सध्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी सामने सुरु असल्याने टीम इंडिया तिकडे असल्याने वामिकाचा वाढदिवस तिथेच मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. अनुष्काने वामिकाचा पहिला वाढदिवस अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा झाल्याचे सांगितले. अनुष्का आणि विराट दोघांसाठी वामिकाचा बर्थडे खूपच खास होता. एक वर्षांपूर्वी वामिका या दोघांच्या आयुष्यात आली आणि त्यांचे जग बदलले.

अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर वामिकाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, “सूर्य खूपच उज्ज्वल होता, प्रकाश सुंदर होता, टेबल भरलेला होता आणि अशाच पद्धतीने आमची मुलगी एक वर्षाची झाली.” अनुष्काने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आणि विराट मजेशीर गप्पा मारताना दिसत असून, पार्टी दरम्यान उन्हात ड्रिंक्सचा आनंद घेताना दिसत आहे.

अनुष्काने तिच्या अजून एका पोस्टमध्ये पार्टीबद्दल सांगताना आणि या दिवसाला अधिक खास बनवणाऱ्या लोकांचे आभार मानताना लिहिले, “संध्याकाळी काही खास लोकांनी हा दिवस अजून छान केला. आणि इथे मी चिंतेत होती की, वामिकाचा पहिला वाढदिवस कसा साजरा होईल. धन्यवाद मित्रांनो. (तुम्हाला माहित आहे की, तुम्ही कोण आहात)”

Anushka Sharma
Photo Courtesy: Instagram/anushkasharma

अनुष्का आणि विराट यांच्या मुलीचा वामिकाचा नुकताच पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. या संपूर्ण एक वर्षात अनुष्का आणि विराट यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वामिकाचे अनेक फोटो पोस्ट केले, मात्र कोणत्याही फोटोमध्ये तिचा चेहरा दाखवला नाही. तिचे सर्व फोटो पाठमोरेंचं शेअर केले. त्यांना वामिका मोठी होते तोपर्यंत तिचा चेहरा जगासमोर आणायचा नाही. याबद्दल या दोघांकडून मीडियाला अनेकदा विनंती केली जाते की, वामिकाचा चेहरा बाहेर येऊ देऊ नका. अनुष्का आणि विराट अनेकदा तिच्या लीला सोशल मीडियावर शेअर करतात. तैमूरनंतर वामिका ही अशी स्टार कीड आहे जिला तिच्या आईवडिलांपेक्षा जास्त प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली किंबहुना मिळते.

हेही वाचा :

हे देखील वाचा