मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) आपल्या बिनधास्त आणि धडाकेबाज अंदाजासाठी ओळखली जाते. तिचा सोशल मीडियावर देखील प्रचंड वावर असतो. अभिनेत्री सोशल मीडियावर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असते. तिचे व्हिडिओ आणि फोटोज चाहत्यांकडून खूप पसंत केले जातात. अशातच आता अभिनेत्रीची कान्स चित्रपट महोत्सवाबद्दल (Cannes Film Festival) केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही कान्स चित्रपट महोत्सव तुफान चर्चेत आहे. जगभरातील सेलिब्रिटींनी या महोत्सवाला हजेरी लावली आहे. तसेच भारतीय सेलिब्रिटींनीही याठिकाणी आपली उपस्थिती नोंदविली आहे. इथे सेलिब्रिटी अतरंगी आणि भन्नाट स्टाईल करून रेड कार्पेटवर उतरतात. काहींना त्यांच्या लूकसाठी वाहवा मिळते, तर काहींना ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. खास बाब म्हणजे, मराठमोळी अभिनेत्री हेमांगीही या सोहळ्याला भेट देण्यासाठी सज्ज झालेली पाहायला मिळाली! (hemangi kavi shared a funny video about cannes film festival 2022)
खरं तर हेमांगीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सुरुवातीला ती हातात आरसा घेऊन मेकअप करताना दिसते. नंतर आरसा बाजूला करतात, तिचा विद्रूप मेकअप दिसतो. यात तुम्ही पाहू शकता की अभिनेत्रीने काळ्या रंगाचा कोट घालून, डोळ्याला काजळ फासलं आहे. या व्हिडिओमध्ये एका सेलिब्रिटीचीही व्हिडिओ क्लिप आहे, जिच्याप्रमाणेच हूबेहूब हेमांगीने मेकअप केला आहे. होय, अभिनेत्रीने सेलिब्रिटीच्या विचित्र मेकअपची नक्कल करून, तिची टिंगल उडवली आहे.
हा व्हिडिओ शेअर करत ती म्हणतेय की, “जेव्हा तुम्हाला चांगला मेकअप आर्टिस्ट परवडत नाही!” तसेच कॅप्शनमध्ये तिने लिहीलंय की, “कान फिल्म फेस्टिवलमध्ये जाण्यासाठी मी तयारी करीत आहे.” हा मजेदार व्हिडिओ नेटकऱ्यांकडून खूप पसंत केला जात आहे. चाहतेही यावर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर लाफिंग एमोजीचा पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा