Thursday, April 25, 2024

Cannes 2022 | ‘या’ गोष्टीला विरोध करत, थेट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये टॉपलेस पोहोचली महिला

सध्या जगभरात कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) जोरात सुरू आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून एकापेक्षा एक सरस फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत, जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या रायपासून (Aishwarya Rai) दीपिका पदुकोणपर्यंत (Deepika Padukone) सर्व भारतीय सिनेतारक सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत. दरम्यान, सध्या या रेड कार्पेटवरून एक महिला सर्वाधिक चर्चेत आली आहे. 

आंदोलन करायला रेड कार्पेटवर आली महिला
सर्व सेलिब्रिटी रेड कार्पेटवर आपले सुंदर लुक दाखवत होते, तेव्हा अचानक एक टॉपलेस महिला रेड कार्पेटवर धावताना दिसली. या घटनेने सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फेडले आणि अंगावर शहारे उभे राहिले. सेलिब्रिटींच्या गर्दीत, एक युक्रेनियन महिला तिच्या शरीरावर युक्रेनियन ध्वजाचा रंग रंगवून “आमच्यावर बला*त्कार करणे थांबवा” असा आरोप करताना दिसली. रशिया आणि युक्रेनमधील युद्धात लाखो महिलांवर बलात्कार होत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. (topless woman suddenly start running on cannes red carpet protest against rape)

ओरडत दिल्या घोषणा
या महिलेचे सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ‘स्टॉप रेपिंग अस’ असे ओरडत ही महिला रेड कार्पेटवर पोहोचली, तेव्हा सगळ्यांच्याच चेहऱ्यावरचे रंग उडाले. अशा स्थितीत तिथे उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकांनी महिलेला झाकून तेथून बाहेर काढले. दरम्यान, फोटोग्राफर्सने हे संपूर्ण दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. या महिलेच्या पाठीवर घाणेरडे शब्दही लिहिले होते.

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध
रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान, रशियन सैनिक युक्रेनच्या महिलांवर बलात्कार करत असल्याचा दावा करण्यात आला होता. समोर आलेल्या वृत्तांचे वर्णन करताना युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, सध्या सुरू असलेल्या तपासानुसार महिलांवरील बलात्काराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत आता या महिलेच्या निषेधाचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा