प्रसिद्ध गायक केके यांच्या निधनाने संपूर्ण सिने जगतावर शोककळा पसरली आहे. आपल्या जादूई आवाजाने अनेक सुपरहिट गाणी गाणाऱ्या केकेंचा कोलकत्तामधील लाईव्ह कार्यक्रमात ह्रदयविकाराचा झटका आला ज्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. एका प्रतिभावान गायकाच्या अशा अकाली मृत्यूने सर्वचजण हळहळ व्यक्त करत आहेत. मराठी सिनेजगतातील लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवीनेही (Hemangi Kavi) एक खास पोस्ट शेअर करत आपल्या भावुक भावना व्यक्त केल्या आहेत.
मराठी चित्रपट जगतातील लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणून हेमांगी कवी ओळखली जाते. आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. यावरुन ती नेहमीच आपल्या भावना व्यक्त करत असते. गायक केके यांच्या मृत्यूनंतर हेमांगी कवीची अशीच एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.ज्यामध्ये तीने आम्ही तुला कधीच माफ करणार नाही असे म्हणत हेमांगी कवीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या या पोस्टमध्ये हेमांगी कवीने “मैत्रीचा, प्रेमाचा सुंदर आवाज गेला. शाळा संपून कॉलेज मधल्या नवनवीन हवेत ”यारों दोस्ती बडी ही हसीन है आणि पल’ या गाण्यांवर तरंगायला लागलो पण कालच्या बातमीने जमिनीवर धापकन खाली पडल्या सारखं झालं. 90 मधल्या लोकांना कळेल मी काय म्हणतेय ते. काही काही गाण्यांनी, आवाजांनी आपल्या आयुष्यातल्या काही क्षणांना व्यापून टाकलेलं आहे. ते गाणं, तो आवाज ऐकला की आपण पुन्हा त्या काळात जातो, time travel सारखं. काल रात्री ते सगळं गोठलं. सुन्न झालं. आमच्या मैत्रीचा, प्रेमाचा बेगरज राजदार अचानक असा घेऊन गेलास, यमा तुला आम्ही कधीच माफ करणार नाही” अशा भावुक शब्दात केकेला श्रध्दांजली वाहिली आहे.
हेही वाचा-