Friday, April 19, 2024

महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी कलाकारांच्या खास शुभेच्छांच्या पोस्टचा सोशल मीडियावर महापूर

रविवार १ मे महाराष्ट दिन. राज्यभरात दिवसभर महाराष्ट्र दिनाचा जल्लोश सुरू आहे. छत्रपती शिवरायांचा, तुकोबांचा, यशवंतराव चव्हाणांचा समृद्ध वारसा सांगणाऱ्या महाराष्ट राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात मोठ्या जल्लोशात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. त्यामुळेच आजच्या दिवशी विविध क्षेत्रात मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन खास पोस्ट शेअर करत या खास दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये मराठी सिने जगतातील कलाकारही मागे नाहीत. पाहूया मराठी चित्रपट  जगतातील कलाकारांनी महाराष्ट्र दिनानिमित्त खास शब्दात केलेल्या खास पोस्ट. 

महाराष्ट दिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावर शुभेच्छांचा महापूर आला आहे. अनेक क्षेत्रातील मान्यवर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट करत या विशेष दिनाच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये मराठी मनोरंजन जगतातील कलाकारांनीही विशेष पोस्ट केल्या आहेत. यामध्ये चित्रपट निर्माता केदार शिंदेने पोस्ट करत गर्जा महाराष्ट्र माझा या गाण्यातील ओळी यापोस्टमध्ये टाकल्या आहेत. त्याचप्रमाणे अभिनेता स्वप्निल जोशीनेही  एक व्हिडिओ शेअर करत जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता रितेश देशमुखनेही गर्व आहे मला या मातीत जन्मल्याचा अशा शब्दात महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे अभिनेत्री हेमांगी कवीनेही  फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना महाराष्ट्र” ह्या नावातच केवढं आव्हान, अभिमान, भावना भरलेली आहे. मोगलांची आणि इंग्रजांची सत्ता या वंशातून उखडून टाकण्याचा प्रयत्न प्रथमतः महाराष्ट्रात व्हावा, हे अद्भूत नव्हे काय? महाराष्ट्राच्या मातीत आणि मराठी माणसाच्या रक्तात असे काय विलक्षण रसायन भरल आहे, की भारताच्या स्वातंत्र्यावर घाला आल्यास पहिल्यांदा महाराष्ट्रातील माणसे खवळून उठतात? भारताचे पहिले स्वराज्यसंस्थापक “छत्रपती शिवराय” हे महाराष्ट्रात जन्माला आले” अशा खास ओळी लिहल्या आहेत.

या मराठी कलाकारांच्या खास पोस्ट सध्या चांगल्याच व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांच्याही जोरदार प्रतिक्रिया पाहायला  मिळत आहेत. दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्रातील लोक त्यांच्या राज्यात महाराष्ट्र दिन साजरा करतात. या दिवशी १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हे राज्य भारत देशाचे राज्य म्हणून ओळखले गेले. तेव्हापासून महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जात होता. या दिवशी राज्यातील शाळा, विद्यापीठे आणि सरकारी कार्यालयांना या राज्य सरकारकडून सुट्टी दिली जाते. वेगेवेगळ्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं जात.

याशिवाय तेजश्री प्रधान, जितेंद्र जोशी आदी अनेक कळकरांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा