Monday, July 1, 2024

हेमंत ढोमेने केलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरील पोस्ट आली चर्चेत

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मशिदीवरील भोंगे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवरुन चांगलाच वाद रंगला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभांमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे या वादाला सुरूवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद मधील सभेत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली आहे असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरुन आता वाद सुरू झाला असून त्यांच्या वक्तव्यावर सिनेजगतातील कलाकारही नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. त्यांच्या याच वक्तव्यावर अभिनेता हेमंत ढोमेने (Hemant Dhome) नाराजी व्यक्त करत एक पोस्ट केली आहे ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

हेमंत ढोमे हा मराठी सिनेमा जगतातील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. अनेक सामाजिक विषयांवर तो सोशल मीडियावरुन आपले मत व्यक्त करत असतो. सध्या राज ठाकरेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलाच वाद रंगला आहे. औरंगाबाद मधील सभेत राज ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असे वक्तव्य केले होते. त्यावरुनच अभिनेता हेमंत ढोमेने आपले मत व्यक्त केले आहे.

आपल्या ट्विटर अकाउंटवरुन त्याने ही पोस्ट केली आहे ज्यामध्ये एक फोटो दिसत असून या फोटोसोबत हेमंतने “छत्रपती शिवरायांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे थोर युगपूरुष” असे लिहले आहे. या फोटोसोबत क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले असाही कॅप्शन त्याने दिला आहे. या पोस्टवर अनेक नेटकरी त्याचे समर्थन करत आहेत तर काही जणांनी त्याला ट्रोलही केले आहे. आता या पोस्टवरुन चांगलाच वाद रंगणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा