Saturday, April 20, 2024

साऊथ चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘आप की कसम’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केली होती बक्कळ कमाई

दिग्दर्शक आणि निर्माता असलेल्या जे ओमप्रकश यांचा ‘आप की कसम’ हा सिनेमा प्रत्येकालाच आठवत असेल. या सिनेमातील गाणी आजही लोकांच्या तोंडी रेंगाळताना दिसतात. ३ मे १९७४ रोजी अर्थात आजच्याच दिवशी ४९ वर्षांपूर्वी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. राजेश खन्ना, मुमताज, संजीव कुमार आदी दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा तुफान गाजला. चित्रपटाच्या कहाणीसोबतच यातील गाणी देखील खूपच गाजली. आज या सिनेमा संदर्भातील काही किस्से आपण जाणून घेऊया.

‘आप की कसम’ हा सिनेमा १९७० साली आलेल्या मल्याळम ‘वाझवे मय्यम’ चित्रपटाचा रिमेक होता. मात्र ‘आप की कसम’ या सिनेमात चित्रपटाचा शेवट वेगळा दाखवला गेला होता. नंतर हाच सिनेमा १९८५ साली ‘एडदुगुला बंधम’ नावाने तेलगूमध्ये प्रदर्शित झाला. ‘आप की कसम’ या सिनेमाला आर. डी. बर्मन यांनी संगीत दिले होते. सिनेमातील ‘जय जय शिव शंकर’, ‘जिंदगी के सफर’, ‘करवटें बदलते रहे सारी रात’ आदी सर्वच गाणी तुफान लोकप्रिय झाली. या सिनेमातील सर्वात जास्त गाजलेले गाणे म्हणजे ‘जय जय शिव शंकर’. हे गाणे आधी असे नव्हते. गाण्यासाठी पंचमदा यांनी एक वेगळीच धून तयार केली होती. मात्र जेव्हा राजेश खन्ना यांना त्यांच्याच अंदाजमध्ये हे गाणे गुणगुणताना त्यांनी ऐकले तेव्हा पंचमदा यांना ती धून आवडली आणि तीच धून फायनल झाली.

या चित्रपटाचे शूटिंग १६ रिलमध्ये पूर्ण झाले आणि चित्रपटाचा मुहूर्त शॉट ३ जानेवारी १९७२ रोजी झाला. क्लिपिंग शॉट देण्यासाठी धर्मेंद्र यांना बोलवण्यात आले होते. या चित्रपटाचे शूटिंग लेह लद्दाख, जम्मू कश्मीर आणि मुंबईमध्ये केले गेले. संजीव कपूर आणि राजेश खन्ना यांचा हा एकत्र असलेला पहिलाच पूर्ण सिनेमा होता. याआधी त्यांनी काही चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. चित्रपटात दाखवण्यात आले होते की, एक गैरसमज किंवा एक शंका संपूर्ण नात्याला पोखरून काढते आणि नाती उध्वस्त करते. ९० लाखात बनलेल्या या सिनेमाने १.६ कोटींची कमाई केली होती.

दिग्दर्शक जे ओमप्रकश यांनी जेव्हा चित्रपट बनवले तेव्हा पहिल्या सिनेमाचे नाव ‘आप की कसम’ ठेवले आणि हा सिनेमा तुफान गाजला त्यामुळे त्यांनी नंतर बनवलेल्या प्रत्येक चित्रपटाचे नाव ‘A’ पासूनच ठेवले. ते ‘A’ला खूपच लकी मानत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा