Thursday, December 26, 2024
[aioseo_breadcrumbs]

राजू, शाम आणि बाबुराव पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज, ‘हेरा फेरी’चा तिसरा पार्ट लवकरच होणार रिलीझ

हेरा फेरी चित्रपटातील राजू, शाम आणि बाबुराव ही पात्र तर सगळ्यांना आठवत असतीलच. या पात्रांनी त्यांच्या विनोदाने आणि मस्तीने सगळ्याची मनं जिंकली होती. पहिल्या आणि दुसऱ्या पार्टमध्ये एवढी मस्ती करून आता हे कलाकार तिसऱ्या पार्टसाठी सज्ज झाले आहेत. हेरा फेरी या चित्रपटाला 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडीयाडवाला यांनी ‘हेरा फेरी 3’ बाबत खुलासा केला आहे. त्यांनी असे सांगितले की, ते पुन्हा एकदा अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्यासोबत तिसरा भाग घेऊन येणार आहेत.

हेरा फेरीचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी एका मनोरंजन पोर्टलसोबत बातचीत करताना सांगितले की, हेरा फेरीचा पुढच्या पार्टची स्क्रिप्ट तयार होऊन आता निश्चित देखील झाली आहे. लवकरच ‘हेरा फेरी 3’ ची अधिकृतरीत्या घोषणा केली जाईल.

त्यांनी पुढे सांगितले की, “या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर आम्ही खूप जास्त लक्ष देत आहोत. आता सगळ्या गोष्टी योग्य जाग्यावर बसल्या आहेत, तर मी एवढंच म्हणेल की, हा चित्रपट तेव्हाच बनेल जेव्हा 2-3 हेरा फेरी एकत्र बनतील.”

फिरोज यांचं अस म्हणणं आहे की, “या चित्रपटाच्या फ्रँचायझीला पुढे घेऊन जाणे खूप अवघड होणार आहे. यापेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारी खूप मोठी आहे. कारण आपल्याला प्रेक्षकांना चांगले प्रोडक्ट द्यायचे आहे. जर आपल्याला एवढी चांगली फ्रँचायझी दिली आहे तर आपल्याला स्टोरी, स्क्रीन प्ले आणि डायलॉग या सगळ्या गोष्ट बेस्ट ठेवल्या पाहिजेत.” त्यांनी पुढे सांगितले की, या चित्रपटात मागच्याच चित्रपटाची कहाणी पुढे चालणार आहे. त्यामुळे सगळ्यांना शेवटच्या सीनचे उत्तर मिळून जाणार आहे.

या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे प्रियदर्शन यांनी दिग्दर्शन केले आहे. दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन नीरज व्होरा यांनी दिग्दर्शन केले होते. आता तिसऱ्या भागाचे दिग्दर्शक कोण असणार आहे यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहे.

‘हेरा फेरी’ चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावलव्यतिरिक्त तब्बू आणि ओमपुरी हे देखील महत्त्वाच्या भूमिका निभावणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तमन्ना भाटियाने वेगळ्याच अंदाजात केला ‘डोन्ट रश चॅलेंज’ गाण्यावर डान्स, व्हिडिओला ५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-‘लग्नानंतर काम करणार नाही’, शूटिंगवर परल्यानंतर अनुष्काचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल

-खेसारी लालचं नवीन गाणं रिलीझ, पंजाबी गायकांनाही देतोय टक्कर; चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद

हे देखील वाचा