Wednesday, July 3, 2024

KBC: शोला मिळाला पहिला करोडपती स्पर्धक; जिंकलेली रक्कम ‘या’साठी करेल खर्च दिव्यांग हिमानी बुंदेला

‘कौन बनेगा करोडपती’चा १३ वा सीझन सुरू होताच चर्चेत आला आहे. या सीझनला करोडपती म्हणून पहिला विजेता देखील मिळाला आहे. दिव्यांग महिला हिमानी बुंदेला या सीझनमधील पहिली करोडपती विजेती ठरली आहे. हा एपिसोड अद्याप प्रसारित करणे बाकी आहे. परंतू, शोच्या अधिकृत सोशल अनाउंसमेंट आणि प्रोमोवरून याचा खुलासा झाला आहे. आता शोची पहिली करोडपती बनलेल्या हिमानी बुंदेलाने आपल्या जिंकलेल्या रकमेचे काय करणार आहे, याचा खुलासा केला आहे. हिमानी बुंदेला उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील रहिवासी आहे.

सर्वसमावेशक कोचिंग संस्था सुरू करण्याची योजना आहे
वृत्तवाहिनीसोबतच्या खास संभाषणात हिमानी बुंदेलाने आपली विजयी रक्कम कुठे खर्च करणार आहे, याची योजना सांगितली आहे. ती म्हणाली की, “मी शोमध्ये जिंकलेल्या रकमेचा खुलासा करू शकत नाही. पण मला सर्वसमावेशक कोचिंग संस्था चालू करायची आहे. माझ्याकडे एक विशेष शाळा आहे पण कोचिंग नाही. या कोचिंगमध्ये, सर्व प्रकारची मुले (अपंगांपासून ते सामान्य) स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास आणि तयारी करतील.

वडिलांनाही मदत करेल
याशिवाय हिमानी बुंदेलाने असेही म्हटले की, ती तिच्या वडिलांनाही या विजयी रकमेतून मदत करेल. जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित असेल. हिमानी म्हणाली की, “या पैशातून मी माझ्या वडिलांना मदत करेन. जेणेकरून ते त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करू शकतील, ज्याच्यावर कोरोनाच्या काळात वाईट परिणाम झाला होता.”

आगामी भागात देईल अमिताभ यांच्या कठीण प्रश्नांची उत्तरे
हिमानी बुंदेला एक दृष्टिहीन स्पर्धक आहे. तिचा उत्साह खूप उच्च आहे. ३०-३१ च्या आगामी भागात म्हणजेच ऑगस्टमध्ये हिमानी अमिताभ यांच्यासमोर बसून त्यांच्या प्रश्नांना सामोरे जाऊन उत्तरे देणार आहे. निर्मात्यांनी सोनी टीव्हीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या एपिसोडचा प्रोमो व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

प्रोमो नुसार एक कोटी जिंकली आहे हिमानी बुंदेला
प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये हिमानीने १५ प्रश्नांची उत्तरे देऊन १ कोटी जिंकली आहे. यानंतर अमिताभ तिला जॅकपॉट प्रश्न विचारतात, तो प्रश्न ७ कोटींचा आहे. १६ व्या प्रश्नाला उत्तर देताना हिमानी म्हणत आहे की “जय माता दी, लॉक करा सर.” जरी खाली पडली तरी काही फरक पडणार नाही, ही देवाची इच्छा आहे. आता त्याचे उत्तर बरोबर आहे की नाही, यासाठी आपल्याला शोची प्रतीक्षा करावी लागेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा