Monday, July 1, 2024

‘डॅडीज स्ट्राँग गर्ल!’ वडिलांच्या आठवणीत हिना खानने केले ‘असे’ काही; पाहून तुम्हीही व्हाल भावुक

अभिनेत्री हिना खान गेल्या काही काळापासून खूपच अस्वस्थ आणि चिंतेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. यामुळे तिला खूप मोठा धक्का बसला आहे. यासोबत, अलीकडेच ती कोव्हिडची देखील बळी ठरली. तिला आणि तिच्या कुटुंबीयांना कोव्हिडची लागण झाल्याची माहिती, हिनाने स्वतः दिली. सध्या अभिनेत्री घरीच क्वारंटाईन आहे.

आता हिनाने तिचा इंस्टाग्राम बायो तिच्या वडिलांना समर्पित केला आहे. त्यात तिने लिहिले, ‘डॅडीज स्ट्राँग गर्ल.’ हिनाच्या या बायोवरून हे स्पष्ट झाले आहे की, तिचे वडील जरी गेले असले, तरीही ती नेहमीच तिच्या वडिलांची ‘स्ट्राँग गर्ल’ राहील.

वडिलांच्या निधनानंतर केली होती भावनिक पोस्ट
वडिलांच्या निधनानंतर हिना एक पोस्ट शेअर करत म्हणाली होती की, “यावेळी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण क्षणी तुमच्या प्रेमाबद्दल आणि समर्थनाबद्दल तुमचे आभार. दरम्यान, माझे सोशल मीडिया अकाऊंट माझी टीम हाताळेल, तेही वर्क कमिटमेंट्ससाठी, धन्यवाद.”

हिनाची टीम आता तिच्या आगामी प्रकल्पांबद्दल पोस्ट करत असते. अलीकडेच हिनाचे ‘बेदर्द’ हे गाणे रिलीझ झाले आहे, जे प्रेक्षकांकडून खूप पसंत केले जात आहे.

वडिलांच्या जवळ होती हिना खान
हिना तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. ती त्यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असायची. इतकेच नाही, लॉकडाऊन दरम्यान तिने वडिलांसोबत अनेक मजेदार व्हिडिओ बनवले होते, जे जोरदार व्हायरलही झाले होते. तसेच, तिचे वडिल अभिनेत्रीची पूर्ण काळजीही घ्यायचे.

जेव्हा अभिनेत्रीची तब्येत बिघडायची, तेव्हा ते स्वत: तिला औषधे खाऊ घालण्यासाठी येत असत. एवढेच नव्हे, तर हिनाचे पैसे वाचवण्यासाठी त्यांनी तिचे सर्व डेबिट आणि क्रेडिट कार्ड बंद केले होते. वास्तविक, हिनाच्या वडिलांनी तिच्या वाढत्या खर्चामुळे, हे सर्व कार्डे बंद केले होते. हिनाने या दरम्यानचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला होता. हिनाचे तिच्या वडिलांशी मैत्रीचे नाते होते.

वडिलांसोबतचा व्हिडिओ झाला होता व्हायरल
अलीकडेच वडिलांसोबत हिनाचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हिना खान तिच्या वडिलांशी बोलताना दिसत होती. हिनाचे वडील सांगत होते की, त्यांनी हिनाचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड बंद केले आहेत. हिनाच्या वाढत्या खर्चामुळे त्रस्त जेव्हा तिच्या वडिलांनी हे पाऊल उचलले, तेव्हा अभिनेत्री खूप चकित झाली होती. व्हिडिओमध्ये ती म्हणाली की, “माझ्याकडे कोणतेही डेबिट आणि क्रेडिट कार्ड नाहीत, तुम्ही त्यांना ब्लॉक केले आहे.” यावर उत्तर म्हणून हिनाच्या वडिलांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या वेळी तिचे पैसे वाचावे, म्हणून त्यांनी कार्ड बंद केली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बाबो! अवघ्या १६ व्या वर्षी अर्जुन कपूरचे होते १५० किलो वजन; एका फूड शोमध्ये सांगितले वजन वाढण्यामागील कारण

-चित्रपटसृष्टीवर दु: खाचा डोंगर! प्रसिद्ध दिग्दर्शक- छायाचित्रकाराचे हृदयविकाराने निधन, अनिल कपूरच्या चित्रपटात केले होते काम

-कोरोना काळात चांगली बातमी! टीव्ही अभिनेता मोहित बनला बाबा, पत्नी अन् मुलासोबतचा पहिला फोटो केेला शेअर

-कपूर कुटुंबाला मोठा धक्का! दिग्गज अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण, मुंबईच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टर म्हणाले…

हे देखील वाचा