Wednesday, October 21, 2026
Home › बॉलीवूड › बाबो! अवघ्या १६ व्या वर्षी अर्जुन कपूरचे होते १५० किलो वजन; एका फूड शोमध्ये सांगितले वजन वाढण्यामागील कारण

बाबो! अवघ्या १६ व्या वर्षी अर्जुन कपूरचे होते १५० किलो वजन; एका फूड शोमध्ये सांगितले वजन वाढण्यामागील कारण

बोनी कपूर यांचा मुलगा आणि अभिनेता अर्जुन कपूर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतो. कधी त्याच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल, तर कधी मलायका अरोराशी असलेल्या त्याच्या संबंधांबद्दल. यावेळी अर्जुनने त्याच्या जीवनाशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे, ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. खरं तर, त्याने म्हटले की, वयाच्या १६ व्या वर्षी त्याचे वजन तब्बल १५० किलोपर्यंत पोहोचले होते, ज्याचे एक मुख्य कारणही होते.

बोनी कपूर आणि मोना शॉरी यांच्या घटस्फोटाची बातमी कोणापासूनही लपलेली नाही. त्यावेळी अर्जुन आयुष्याच्या अत्यंत कठीण टप्प्यातून जात होता आणि त्याच्या पालकांचा घटस्फोट त्याच्याकडून सहन केला जात नव्हता. ज्यामुळे तो अधिक खाऊ लागला. त्याचा परिणाम असा झाला की, त्याचे वजन १५० किलोपेक्षा जास्त झाले.

नुकताच अर्जुन कपूर एका फूड शोमध्ये दिसला होता. ज्यामध्ये त्याने संजय कपूर आणि माहिप कपूर यांच्यासाठी उत्तम खाद्यपदार्थ बनवले. त्यावेळी त्याने हे उघड केले की, जेव्हा तो १६ वर्षांचा होता, तेव्हा त्याचे वजन १५० किलोपेक्षा जास्त होते. ज्यामुळे त्याला दमाही झाला. या कारणामुळे तो जास्त काळ धावूही शकत नव्हता.

शो दरम्यान अर्जुन कपूर म्हणाला, “माझे आई वडील विभक्त झाले, तेव्हा मी अन्नाचा आसरा घेतला होता. जेव्हा मला खूप जास्त ताण वाटत असायचा, तेव्हा मी खाण्याच्या दिशेने पळायचो. नंतर ही माझी न सुटणारी एक सवय बनली. मला खायला आवडू लागले. त्यावेळी फास्ट फूडची संस्कृती भारतात नवीन आली होती आणि तेव्हा मला थांबवणारे कोणीही नव्हते. माझी आई देखील म्हणायची की, हे खाण्या-पिण्याचे वय आहे आणि यामुळे माझे वजन वाढतच गेले.”

तथापि, बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी वजन कमी करण्यासाठी त्याने खूप मेहनत केली आणि तो यशस्वीही झाला. आज तो फिट अँड फाईन कलाकारांमध्ये गणला जातो. तसेच, अर्जुन कपूर व्यतिरिक्त मलायका अरोरा, करीना कपूर आणि करण जोहर लवकरच या फूड शोमध्ये दिसणार आहेत. अर्जुन कपूर या दिवसांत मलायका अरोराला डेट करत आहे. बर्‍याच वेळा दोघांना एकत्र पाहिले जाते. याशिवाय हे दोघे एकमेकांच्या फॅमिली पार्टीतही सहभागी होतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मलाही राग आला होता…’, म्हणत हिमांश कोहलीने पहिल्यांदाच केला नेहा कक्करसोबतच्या ब्रेकअपवर खुलासा

-‘नृत्याने अंधार आणि वेदनाविरुद्ध लढण्यास मिळते मदत’, म्हणत अभिनेत्री संदीपा धरने नृत्य दिनानिमित्त केला आयुष्यातील मोठा खुलासा

-रेमो डिसूजाने पत्नी लिजेलसोबत केला मजेशीर व्हिडिओ शूट, पाहून तुम्हीही खदखदून हसाल

-खरंच! आयुष्यातील पहिली किस म्हणत रणबीर कपूरने घेतले होते माधुरी दीक्षितचे नाव, सांगितले कधी आणि कसे

हे देखील वाचा