Thursday, June 26, 2025
Home टेलिव्हिजन Cannes 2022 | कान्स महोत्सवात दुर्लक्षित झाल्यामुळे हिना खान झालीय दु:खी, केले आतील खुलासे

Cannes 2022 | कान्स महोत्सवात दुर्लक्षित झाल्यामुळे हिना खान झालीय दु:खी, केले आतील खुलासे

टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खानने (Hina Khan) कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ (Cannes Film Festival 2022) मध्ये तिचे सौंदर्य दाखवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. हिना खानचे आतापर्यंत जे काही लूक समोर आले आहेत, त्यात ती कमाल दिसली. पण तुम्हाला माहित आहे का, हिना खान नाराज झाली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमुळे तिचे हृदय तुटले आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ दरम्यान, हिना खानला इंडियन पॅव्हेलियनच्या उद्घाटन समारंभाचे निमंत्रण मिळाले नाही, ज्यामुळे ती खूप नाराज आहे. कान्स येथे ज्या दिवशी भारतीय पॅव्हेलियनचे उद्घाटन झाले, त्या वेळी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह सुप्रसिद्ध अभिनेत्रीही उपस्थित होत्या. (hina khan opened up upset for not being invited to cannes 2022)

यावेळी उर्वशी रौतेला, दीपिका पदुकोण, पूजा हेगडे, तमन्ना भाटिया, गायिका माने खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. मात्र यावेळी हिना खान नव्हती. कारण तिला निमंत्रित करण्यात आले नव्हते. कान्स येथे फिल्म कम्पेनियनला दिलेल्या मुलाखतीत हिना खानने आता यावर नाराजी व्यक्त केली आहे. हिना खान म्हणाली, “आम्ही सर्व एकाच इंडस्ट्रीचे. प्रत्येकजण केवळ भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येथे आला आहे.” हिना पुढे म्हणाली की, ती तिच्या चित्रपटाच्या पोस्टर लाँचबद्दल खूप उत्सुक आहे. ती म्हणाली, “मी या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यासाठी येणार असल्याचे सर्वांनाच माहीत होते. मी खूप उत्साहित होतो कारण मी भारतीय पॅव्हेलियनमधून आहे.”

पुढे हिना खान म्हणाली की, “इंडस्ट्रीत अजूनही उच्चभ्रू व्यवस्था आहे. इंडियन पॅव्हेलियनमध्ये एक कार्यक्रम होता सर्वजण तिथे होते. बॉलिवूडचेच नाही तर गायक देखील तिथे उपस्थित होते. मला त्याचा अभिमान आहे. पण मी तिथे का नव्हते, फक्त याचे खेद वाटतो.”

हिना खान ‘ये रिश्या क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षरा नावाच्या भूमिकेतून घराघरात पोहचली आहे. ती सध्या इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक मालिका तसेच रिऍलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. तसेच एका चित्रपटात देखील काम केले आहे. हिना खान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तसेच तिच्या लूकमुळे देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

हेही वाचा

हिना खानच्या कान्स चित्रपट महोत्सवातील लूकने चाहते घायाळ, बॉलिवूड अभिनेत्रींना दिली जोरदार टक्कर

हिना खानने इंग्रजी गाण्यावर मारले लटके झटके, एकदा पाहाच हा व्हिडिओ

यामी गौतमने मिळवला हिना खानच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ताबा, परत देण्यासाठी ठेवली ‘ही’ अट

हे देखील वाचा