×

हिना खानने इंग्रजी गाण्यावर मारले लटके झटके, एकदा पाहाच हा व्हिडिओ

टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान ‘ये रिश्या क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षरा नावाच्या भूमिकेतून घराघरात पोहचली आहे. ती सध्या इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक मालिका तसेच रिऍलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. तसेच एका चित्रपटात देखील काम केले आहे. हिना खान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तसेच तिच्या लूकमुळे देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती अनेकवेळा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या दिवसात हिना खान तिच्या सुट्ट्या एंजॉय करत आहे. याबाबत काही पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. ज्यात ती डान्स करताना दिसत आहे.

हिना खानने जो व्हिडिओ शेअर केला आहे. तो इजिप्तमधील आहे. या व्हिडिओमध्ये हिना इंग्रजी बिटवर डान्स करताना दिसत आहे. तिच्या बॅकग्राउंडमध्ये पिरॅमिड दिसत आहे. तिचे हे लटके झटके सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने एक मजेशीर लापशन देखील दिले आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “हा हा हा सकरा स्टेप, पिरॅमिडवर पुन्हा एकदा रोमांच.”

https://www.instagram.com/p/CaUmJt6IZ1X/?utm_source=ig_web_copy_link

तिच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओ हे हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत. तसेच बाकी अनेक चाहते कमेंट करून तिच्या डान्सचे कौतुक करत आहेत. तिचा एका चाहत्याने लिहिले आहे की, “तुला डान्स येत नाही.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे की, “जो हिना से जले जरा साईट से चले.” तसेच बाकी अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

https://www.instagram.com/p/CaBzXapoz-t/?utm_source=ig_web_copy_link

यासोबतच हिनाने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हिना ती पिरॅमिड शेजारी उभी राहून पोझ देताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे. ती खूपच कूल लूकमध्ये दिसत आहे. तिने हा फोटो शेअर करून लिहिले की “मिस्र के सकारा में बने अब तक के पहले पिरॅमिड के सामने एक-एक कदम..” तसेच तिने तिच्या व्हॅकेशनचे इतर अनेक फोटो शेअर केले आहेत. बाकी काही फोटोमध्ये हिना उंटासोबत दिसत आहे.

हेही वाचा :

Latest Post