Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

हिना खानची प्रकृती बिघडली, सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूने अभिनेत्रीला बसलाय धक्का

हिना खान आणि सिद्धार्थ शुक्लाच्या मैत्रीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? हिना आणि सिद्धार्थ ‘बिग बॉस’च्या घरात अगदी जवळचे मित्र बनले होते. हिनाने सिद्धार्थसोबत ‘तुफानी सिनीयर्स’ म्हणून ‘बिग बॉस १४’च्या घरात प्रवेश केला होता. आता हिना सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवण्यास तयार नाहीये. काही महिन्यांपूर्वी वडिलांना गमावल्यानंतर हिनाची स्थिती किती नाजूक झाली होती. ती त्या परिस्थितीला तोंड देऊन, कशीबशी सावरली होती. मात्र, सिद्धार्थची अचानक झालेल्या एक्झिटमुळे हिनाला मोठा धक्का बसला आहे.

आयुष्यातील या धक्कादायक घटनेविषयी बोलताना हिनाने एक पोस्ट शेअर केली आहे. हिनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करताना लिहिले की, “मला असे वाटते की, माझ्या गोड किंवा आंबट अनुभवानंतर मी माझ्या आयुष्याला थोडे चांगलेच ओळखले आहे. परंतु जीवनाला आतापर्यंतच्या सर्वात अप्रत्यक्षित स्वरूपात बाहेर येण्याचा एक मार्ग आहे. हे समजून घेणे सुरू ठेवून, मी सिद्धार्थच्या कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करते. तुम्हाला सर्वांना हे दुःख पचवण्यासाठी देवाने शक्ती द्यावी तसेच सिद्धार्थला सुख आणि शांती लाभो. यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते.”

आणखी एक ट्वीटमध्ये हिनाने सांगितले की, ती सध्या ठिक नाही आणि खूप घाबरली आहे. या बातमीवर हिनाचा अजूनही विश्वास बसत नाही. हिनाने लिहिले की, “माझ्या वैयक्तिक नुकसानीच्या मागील अनुभवांनंतर, माझ्या प्रिय मित्राच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. मी सध्या नाराज आहे आणि माझी मानसिक स्थितीही खालावली आहे. मी सुद्धा तुमच्याप्रमाणेच अशा प्रकारच्या बातम्यांना सामोरे जात आहे. #RIPHero #SidharthShuklaTheShiningStar (sic)”

दरम्यान, सिद्धार्थचे गुरुवारी (२ सप्टेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील कूपर रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सिद्धार्थ त्याच्या मागे आई आणि दोन बहिणी सोडून निघून गेला आहे. ४० वर्षीय सिद्धार्थ ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’ यांसारख्या लोकप्रिय टेलिव्हिजन शोमध्ये दिसला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…

हे देखील वाचा