Saturday, July 6, 2024

फॅमिली मॅन ते मनी हाईस्ट, २०२१ मध्ये ‘या’ १० वेबसीरिजने केल्या चाहत्यांच्या बत्त्या गुल

चित्रपटांना उत्तम पर्याय म्हणून वेबसीरिजकडे पाहिले जाते. कोरोनाकाळात चित्रपटगृह बंद असताना वेबसीरिज हे एकमेव माध्यम प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. वेबसीरिजला मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहून अनेक बॉलिवूडमधील मोठमोठे चेहरे या माध्यमाकडं आकर्षित झाले. याशिवाय अनेक बॉलिवूडमधील अपयशी कलाकारांना ठरणारे माध्यम म्हणून देखील वेबसीरिजची ओळख बनलीय. अतिशय वेगवेगळ्या आणि पठडीबाहेरील विषयांवर वेबसीरिज तयार होतात. त्यामुळे अशा वेबसीरिज बघणं प्रेक्षकांसाठी जणू एक पर्वणीच. आता २०२१ वर्षाला आपण गुडबाय म्हटलंय, पण २०२१ मध्ये प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या वेबसीरिज कोणत्या होत्या तुम्हाला माहितीये का? नसेल, तर काळजी नसावी. आपण दहा वेबसीरिजबद्दल पाहणार आहोत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

स्पेशल ऑप्स
यादीत पहिल्या क्रमांकावर नाव येतं, ते म्हणजे स्पेशल ऑप्स या वेबसीरिजचं. केके मेनन, आफताब शिवदासानी, आदिल खान, विनय पाठक अभिनित ‘स्पेशल ऑप्स’ सिरीजचा दुसरा भाग प्रदर्शित प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. नीरज पांडे आणि शिवम नायर दिग्दर्शित ही वेबसीरिज एक ऍक्शन थ्रिलर ड्रामा सीरिज होती. या सीरिजच्या दुसऱ्या भागाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता.

आर्या २
सुंदर अभिनेत्री सुश्मिता सेनची बहुप्रतिक्षित वेबसीरिज ‘आर्या २’ नुकतीच प्रदर्शित झाली. या वेबसीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या वेबसीरिजला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय.

अरण्यक
रवीना टंडनची पहिली वेबसीरिज असणारी ‘अरण्यक’ वेबसीरिज १० डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालीय. या वेबसीरिजला देखील तुफान प्रतिसाद मिळाला.

हाऊस ऑफ सिक्रेट्स
दिल्लीमधील एकाच घरातील ११ व्यक्तींच्या मृत्यूने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. याच घटनेवर आधारित ‘हाऊस ऑफ सिक्रेट्स’ ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली तिला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला.

फॅमिली मॅन २
मनोज बाजपेयी आणि समंथा रूथ प्रभू यांची ‘फॅमिली मॅन २’ या वेबसीरिजची सर्वच लोकांना प्रतीक्षा होती. या सीरिजला देखील प्रेक्षकांनी उत्तुंग प्रतिसाद दिला.

मनी हाईस्ट ५
यावर्षातील सर्वात जास्त बहुप्रतिक्षित सीरिज म्हणून ‘मनी हाईस्ट ५’ या वेबसीरिजचे नाव येईल. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या वेबसीरिजला देखील प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.

गुल्लक
एक सीजन आधीच प्रदर्शित झालेल्या ‘गुल्लक’ या वेबसीरिजच्या दुसऱ्या पर्वाची सर्वांनाच उत्सुकता होती. कौटुंबिक ड्रामा असलेल्या या वेबसीरिजला देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

एस्पिरेंट्स
‘एस्पिरेंट्स’चा पहिला सिझन युट्यूबवर प्रदर्शित केला गेला होता. यात जीवनात येणारे अनेक उतार आणि चढाव दाखवले गेले आहेत. या वेबसीरिजलाही तुफान लोकप्रियता मिळाली होती.

तांडव
सुरुवातीला मोठ्या वादात अडकलेल्या ‘तांडव’ वेबसीरिजवर मोठ्या प्रमाणात टीका झालेली. मात्र, नंतर ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यास यशस्वी ठरली.

स्क्विड गेम
संपूर्ण जग ज्या वेबसीरिजची वाट बघत होते, ती वेबसीरिज म्हणजे ‘स्क्विड गेम’. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या वेबसीरिजने प्रचंड लोकप्रियता मिळवली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

विसाव्या वर्षी साकारला ८० वर्षांचा म्हातारा, दिलीप साहेबांवरील प्रेमाखातर मनोज यांनी बदलले स्वत:चे नाव

एवढ्या मोठ्या सुपरस्टारने ‘लायगर’च्या ट्रेलर लाँचवेळी का घातली १९९ रुपयांची चप्पल?, जाणून घ्या कारण

अनिल कपूरची मस्ती त्यालाच भोवली; एका चापटीने भागलं नाही, म्हणून जग्गू दादाकडून १७ वेळा खाल्ली कानाखाली

हे देखील वाचा